बौद्ध समाजातील लोकांनी मताचे मोल समजून घ्यावे- आ. राजाभाऊ खरे
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- बौद्ध समाजातील लोकांनी आपल्या मताचे मोल समजून घ्यावे
लागेल. यापुढील काळात राजकीय बदला घेण्यासाठी एकजूटीने करू. पंढरपूर या जन्मभूमी मध्ये झालेल्या हा सत्कार सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन मोहोळचे आ. राजाभाऊ यांनी केले.घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ८७ वर्षांपूर्वी पंढरपूर शहरातील जुना कराड नाका येथे भेट दिली होती. या दिनाचे औचित्य साधून कराड नाका ही जन्मभूमी असलेले आ. खरे हे मोहोळचे आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. पंचशील मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष आर.पी. कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते.वपन दिन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना लागेल ती ताकद देऊन परिवर्तन
घडवू. आतापासून तयारी सुरू केली आहे असेही आ. खरे यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ सरवदे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात ५० वर्षात बौद्ध समाजाला राजाभाऊ खरे यांच्या रूपाने केवळ दुसऱ्यांदा आमदार म्हणून संधी मिळाली आहे. मागासवर्गीय समाजासाठी मोठा निधी असतो. हा निधी दुसरीकडे वळवू नये यासह समाजाच्या प्रश्नांसाठी आ. खरे यांनी आवाज उठवावा, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डी. बी. पाटोळे यांनी केले. आर. पी. कांबळे, सुधीर मागाडे यांनीही आ. खरे यांच्या लहानपणी
पासूनच्या आठवणी सांगितल्या. यावेळी आ. खरे यांच्या पत्नी तृप्तीताई खरे, आई कांताबाई खरे, वडील ज्ञानू खरे यांचाही यथोचित सन्मा करण्यात आला. कुमार ढवळे यांनी आभार मानले.
चौकट
कॉलेज जीवनापासून आमदार होण्याचे ध्येय
आपण पंढरपुरात कॉलेजला असतानाच १९९१ मध्ये आमदार
होण्याचे स्वप्न बाळगून ते ध्येय ठेवले होते. त्यासाठी तब्बल
३४ वर्ष संघर्ष करावा लागला. चळवळ कधीही न सोडता प्रचंड
इच्छा शक्तीच्या जोरावर विधानसभेत जाण्याचे स्वप्न सत्यात
उतरवले आहे. सर्वपक्षीय लोकांशी चांगले संबंध ठेवून हा विजय
मिळविणे सोपे गेले. प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचीही फार
मोलाची साथ मिळाल्याचे आमदार खरे यांनी सांगितले.
0 Comments