मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या पुरस्कारांचे वितरण
बार्शी (कटूसत्य वृत्त):-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करून शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार समाजामध्ये रुजवण्याचे काम संभाजी ब्रिगेड करत आहे, या विचारांचे जतन केले जात आहे, असे मत आ.अभिजित पाटील यांनी व्यक्त केले.मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड बार्शीच्यावतीने शनिवारी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडला.त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते प्रा. तानाजी ठोंबरे होते. व्यासपीठावर पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. संदीप तांवारे,नवनाथ कसपटे, लक्ष्मण संकपाळ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, रवी कापसे उपस्थित होते. या पुरस्कारामुळे माझी जवाबदारी वाढली आहे.आगामी काळात फुले-शाहू-आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या विचाराने आमदारकीचा उपयोग सामान्य जनतेसाठी करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.आ. जयंत आसगावकर म्हणाले, मागील १४ वर्षांपासून संभाजी ब्रिगेड क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करून शिक्षकांच्या कामाचे कौतूक करत आले आहे. सामाजिक संघटना ज्यावेळेस शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते. त्यावेळेस शिक्षकांनादेखील आधार वाटतो.प्रास्ताविकात संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुका अध्यक्ष आनंद काशीद यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्याची व राववलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रमोद भोंग यांनी केले तर पुरस्कार वितरणाची प्रस्तावना खंडू डोईफोडे यांनी केली. आभार बालाजी डोईफोडे यांनी मानले.
चौकट
यांचा झाला सन्मान
राजेंद्र गायकवाड, रंजना माने, कमलाकर गायकवाड, सय्यद जरीना,
तूर रहमान, संतोष घावटे, संभाजी बचुटे, श्रीहरी चव्हाण,
शाहरुख शेख, ज्ञानेश्वर पिसाळ, विजया नवले, विजयकुमार डुरे,
प्रा. डॉ. रत्नदीप सोनकांबळे, प्रा. मनोज गादेकर, प्रशांत ठाकरे, प्रदीप
कांदे, तानाजी लोंढे, गुलाब शेख, कल्पना उकिरडे, अमोल देशमुख,
सुनील मगर, सुजित जाधव, प्रा. समाधान गायकवाड, सचिन छबिले,
संदीप साठे, संतोष घोलप, प्रा. राजकन्या बचुटे आदी.
0 Comments