हिरकणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने जिजाऊ मॉ साहेंबाची जयंती उत्साहात साजरी
अक्कलकोट, (कटूसत्य वृत्त):- सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, महिला सबलीकरणच्या कार्यात अग्रेसर असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेंबाची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. महिला चळवळीचे व्यासपिठ असून संस्थेकडून सुरू असलेल्या कार्यामुळे संस्थेचे नाव आता तालुका, जिल्ह्या पुरते राहिलेले नाही तर राज्यात झालेले आहे.
सदर संस्थेला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व आधार स्तंभ अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. दरम्यान संस्थेच्या कार्यात राष्ट्रामाता जिजाऊं मॉ साहेंबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई जन्मेजयराजे भोसले, उपाध्यक्ष रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, स्मिता कदम, स्वाती निकम, उज्वला भोसले, सुवर्णा घाटगे, छाया पवार, सपना माने, क्रांती वाकडे, राजश्री माने, कल्पना मोरे, सदिछया शिर्के, लता शिर्के, दीपिका शिर्के, ज्योती कदम, विशाखा घाटगे आदीजण महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments