कुंभार वेस व्यापारी असोसिएशनला शासकीय कामात सर्वतोपरी सहकार्य करू आ. विजयकुमार देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील कुंभारवेस व्यापारी असोसिएशनच्या कोणत्याही व्यापारी सदस्याला शासकीय कामात मदत लागत असेल तर आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले.
उदगिरी बंधू यांच्या आर. आर.हाऊस मध्ये असोसिएशनच्या सभासदांना प्रमाणपत्राचे वाटप या संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रवीण वाले, अध्यक्ष रविकांत तंबाके, कार्याध्यक्ष चन्नवीर दुलंगे, सचिव संतोष उदगिरी आदी उपस्थित होते.
कुंभारवेस व्यापारी असोशियन करिता एखाद्या ऑफिसची गरज असून समोर कुंभारवेस शॉपिंग सेंटर असून त्यावरील एक हॉल रिकामे आहे. ते भाडेतत्त्वावर द्यावे अशी विनंती आमदार विजयकुमार देशमुख यांना कार्याध्यक्ष चन्नवीर दुलंगे यांनी केले.
व्यापारी सदस्यांना व्यापार करीत असताना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये म्हणून एक का सोशल असणे गरजेचे आहे आणि त्याचे प्रमाणपत्र देखील तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे आम्ही हे प्रमाणपत्र वाटप करीत असल्याचे मत अध्यक्ष रविकांत तंबाके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना एडवोकेट चिवरी यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी केले तर आभार सहसचिव विनय गुडपल्ली यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य आणि व्यापारी बंधूंनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमास कुंभारवेस व्यापारी असोसिएशनचे सर्व व्यापारी बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments