Hot Posts

6/recent/ticker-posts

नागनाथ महाविद्यालयात कायदेविषयक प्रबोधन शिबिर

 नागनाथ महाविद्यालयात कायदेविषयक प्रबोधन शिबिर





मोहोळ शहर (कटूसत्य वृत्त) :- ग्राहक समिती, महामार्ग पोलीस मोडनिंब व नागनाथ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नागनाथ महाविद्यालयात कायदेविषयक प्रबोधन शिबीर घेण्यात आले. ग्राहक समिती प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड हे अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांना सुरक्षाचे महत्व, नियमाचे पालन करणे, स्वतःची काळजी घेणे, होणारा दंड अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधिकारी बालाजी साळूंके, पोलीस हवालदार दादासाहेब लोंढे, प्राचार्य बी. एन. बागवान व पी. एस. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंदराव देशमुख बबनराव नरुटे, प्रमोद लांडे, दाजी वाघमोडे, अविनाश बाबर उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. के. माळी यांनी केले. ग्राहक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ यांनी आभार मानले. के. पी. कांबळे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments