प्राध्यापक हनुमंत चोरमले महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाकळी चे जूनियर विभाग प्रमुख प्राध्यापक हनुमंत चोरमले यांना 2025 या सालचा स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ तू मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक व सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले. दि. 12.1.2025 रविवार रोजी व्यंकटेश महाजन महाविद्यालय धाराशिव येथे नामवंत भोसले हायस्कूल चे संस्थापक सुधीर अण्णा पाटील, एडवोकेट तुकाराम जी शिंदे प्रदेशाध्यक्ष कुणबी मराठा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ. बापूसाहेब अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे प्रदेश सचिव प्रा. गंगाधर पडनुरे, कार्याध्यक्ष प्रा. मारुती खरात सर, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. देविदास जगताप, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. होन कडे सर, उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय काळेल, प्रदेश कार्याध्यक्ष घोडके सर, प्रवक्ते प्रा. गणेश नावडे सर धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख, डॉ.भाग्यश्री राठोड महिला जिल्हाध्यक्ष सोलापूर, मीनाक्षी जाधव, रमेश लोखंडे, वाहिद सय्यद या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या संपूर्ण यशामध्ये आपली आई वडील, व स्वर्गीय गणपत आबा माने पाटील यांची प्रेरणा, आपले सर्व गुरुजन सहकारी मित्र व गावातील मार्गदर्शक गुणीजन ग्रामस्थ या सर्वांच्या आशीर्वादामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. हा सन्मान माझा एकट्याचा नसून आपणा सर्वांचा आहे अशी भावना प्रा. चोरमले सरांनी व्यक्त केली. याप्रसंगी माढा तालुक्याचे भाग्यविधाते मा आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे मा आमदार संजय मामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन व संस्थेचे मार्गदर्शक मा.रणजितसिंह शिंदे, संस्थेचे अध्यक्ष व सभापती विक्रम दादा शिंदे, प्रशालेचे प्राचार्य प्रा. महादेव सुरवसे सर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग आबा घाडगे व हिम्मत भाऊ सोलंकर, कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी चे संचालक किसन बापू पाटील, सोसायटीचे चेअरमन भारत माने सर, टाकळी चे सरपंच तानाजी सलगर, उपसरपंच अशोक गायकवाड, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सर्जेराव भोसले सर, हरिभाऊ पाटील सर, भोईसर, सोनवणे सर,आर्या पब्लिक स्कूलचे प्राचार्य चंदनकर सर व त्यांचे सर्व सहकारी, थोरात सर बंडगर सर वाळेकर सर, तांबवे सर, महादेव भोसले,नाना घाडगे,आप्पा कांबळे , सर्व माजी विद्यार्थी व टाकळी ग्रामस्थ यांनी त्यांच्या अभिनंदन केले.
0 Comments