Hot Posts

6/recent/ticker-posts

९०० वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात; ६८ लिंगाला तेलाभिषेक

 ९०० वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात; ६८ लिंगाला तेलाभिषेक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच ग्रामदैवत असलेल्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजच्या यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे. विविध भाविक या यात्रेत सहभागी असतात. ५ दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी यान्नीमज्जन म्हणजेच तैलअभिषेक सोहळा आज पार पडत आहे.

रविवार १२ जानेवारीला सकाळी ८.३० च्या सुमारास यात्रेचे प्रमुख मानकरी असलेल्या प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून मनाच्या सात नंदीध्वजांची मिरवणूक सुरवात झाली आहे.

सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरच्या रक्षणासाठी शहराच्या चारही बाजूने ६८ लिंगाची स्थापना केली आहे, मनाच्या सात नंदीध्वजांची नगरप्रदिक्षणा काढत ६८ लिंगाना तैलअभिषेक घालतात. या सोहळ्यात सर्व मानकरी आणि सिद्धरामेश्वरांचे भक्त बाराबंदी परिधान करून या सोहळयात सहभागी झाले आहेत.

केवळ सोलापूरच नाही, तर कर्नाटक आंध्रप्रदेश या वेगवेगळ्या राज्यातून हजारो लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. यावेळी भाविकांनीची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सुरवात झाली असून सोलापुरातील वेगवेगळ्या भागातून प्रमुख रस्तावरुन मिरवणूक सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात सोहळा पार पडणार आहे. खरंतर सिद्धरामेश्वरांची यात्रा ही प्रतीकात्मक विवाह सोहळा आहे. आणि या यात्रेतील पहिला दिवस हा हळदीचा असतो. म्हणजेच तैलअभिषेक सोहळा आज पार पडत असतो.

सरकारी आहेर

ब्रिटिश काळापासून चालत आलेली ९०० वर्षाची परंपरा असलेली म्हणजे नंदीध्वज मिरवणूक ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सरकारी आहेर दिला जातो.

मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी

अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी तैलाभिषेक सोहळ्यात सोलापूरच्या मुस्लिम बांधवांकडून मनाच्या सातही नंदीध्वजावर पुष्प उधळून स्वागत करतात.
Reactions

Post a Comment

0 Comments