Hot Posts

6/recent/ticker-posts

मन आणि मेंदूच्या मशागतीसाठी वाचनाची गरज- प्रा. विष्णू सुर्वे

 मन आणि मेंदूच्या मशागतीसाठी वाचनाची गरज- प्रा. विष्णू सुर्वे



अकलूज (कटूसत्य वृत्त):- शेतकरी जसा शेतीची मशागत करतो तसे पुस्तके मन आणि मेंदूची मशागत करतो कारण न वाचणाऱ्या व्यक्तींचे मन आणि मेंदू पडीक जमिनीसारखे अविकसित राहतो. म्हणून वाचकांनी सर्व क्षेत्रात यशस्वी झालेल्या महापुरुषांची चरित्रे कोणत्याही जाती पातीचा विचार न करता वाचावीत त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण विकास होतो असे मत इंग्रजी विभागाचे प्रा. विष्णू सुर्वे सर यांनी व्यक्त केले. ग्रंथालयाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राबवित असलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमांतर्गत  वाचन कौशल्य कार्यशाळा या उपक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. के. टिळेकर, आय क्यू ए सी चे समन्वयक डॉ. एस. एस. देवकर,  ग्रंथालय विभाग प्रमुख डी. एस. पाटील, लेखक ता. सा. बावळे, डॉ. व्ही. एम आवड व इतर प्राध्यापक उपस्थित होते. ते आणखी पुढे म्हणाले की, शारीरिक व्यायाम शरीराच्या आरोग्यासाठी जसा केला जातो तसा पुस्तकांचे वाचन मनाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो तसेच दलित आत्मकथने वाचत असताना त्यांची दुःखे व समस्या पाहता आपल्या आयुष्यात येणारी दुःखे काहीच नाहीत व या देशात सर्व क्षेत्रात मोठी झालेली माणसे उत्तम वाचक होते म्हणून ते यशस्वी झाले. यावेळी प्रा. विष्णू सुर्वे सर यांनी यशवंतराव चव्हाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, महात्मा फुले इ. ची उदाहरणे दिली.
तसेच दुसऱ्या सत्रात लेखक व वाचक सुसंवाद या उपक्रमांतर्गत कथाकार असलेले ता. सा. बावळे यांनी वाचकांशी सुसंवाद साधला त्यावेळी बोलताना बावळे यांनी कथालेखन करत असताना समाजात पाहिलेली विविध वृर्तीची व प्रवृत्तीची माणसे कथा लेखनासाठी उपयुक्त पडतात तसेच आजचा चांगला वाचक हा उद्याचा चांगला लेखक होऊ शकतो कारण लेखनाची बीजे वाचनातून सापडतात म्हणून वाचकाने जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केले पाहिजे असे पुढे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर सर यांनी वाचकांना संबोधित करताना म्हणाले की, वाचकानी वाचनाची विविध कौशल्य अंगी जोपासली पाहिजेत. तरच आजचा वाचक आपल्या कौशल्याच्या जोरावर उद्याचा उत्कृष्ट लेखक व चांगला वाचक होऊ शकतो. यावेळी महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रा. सोमनाथ चव्हाण यांनी ग्रंथालयास आठ पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे डॉ. जे. डी परकाळे सर यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. एन. टी. लोखंडे सर यांनी करून दिली तर आभार डॉ. सी. बी. लोंढे यांनी मांडले. या उपक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा अभिनव उपक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयातील कर्मचारी डी. डी. सुर्वे सहा. ग्रंथपाल, आय. बी. शेख राहुल जाधव आणि बापू चव्हाण तसेच प्रबंधक बामणे आणि कार्यालय अधीक्षक मालुसरे परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments