गेल्या 10 वर्षात झालेले 80 टक्के खून वाल्मिक कराडने केले
जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा
मुंबई (कटूसत्य वृत्त):- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येसंबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राज्यातील अनेक मोठे नेते दाखल झाली होती. जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. मोर्चात बोलताना त्यांनी काही गंभीर आरोपही केली. आता परत एकदा जितेंद्र आव्हाड यांनी आपला मोर्चा हा वाल्मिक कराडकडे वळवल्याचे बघायला मिळतंय.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. मी पुन्हा एकदा म्हणतोय की, धनंजय मुंडे याने हा खून केला नाहीये....पण वाल्मिक कराड हा या हत्येचा प्लॅनर शंभर टक्के आहे, हे मी म्हणतो. हेच नाहीतर मागील दहा वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडने प्लॅनिंग करून केले आहेत, असे धक्कादायक विधानही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
बीडमध्ये पोलिसांची कशाप्रकारे दादागिरी सुरू आहे, हे सांगताना देखील जितेंद्र आव्हाड हे दिसले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी बीडमध्ये गेल्यावर कशाप्रकारचा अनुभव आला आणि पोलिसांची कशी दादागिरी सुरू आहे हे देखील सांगितले आहे. खरोखरच 80 टक्के खून कराडने केले का? याची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
जितेंद्र आव्हाड हे संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना दिसत आहेत. आता त्यांनी कराडवर गंभीर आरोप केलाय. काही दिवसांपूर्वीच कराडने सीआयडीच्या मुख्यालयात आत्मसर्मपण केले. त्यानंतर त्याला केज न्यायालयात हजर केले. सध्या कराडची चाैकशी सुरू आहे. याप्रकरणी काही मोठे खुलासे हे होऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आरोपींनी मदत करणाऱ्याला देखील कडक शिक्षा होईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशी द्यावी, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
0 Comments