Hot Posts

6/recent/ticker-posts

एकीकडे महायुती सरकारचा शपथविधी तर दुसरीकडे EVM विरोधात यल्गार

 स्वाक्षरी मोहीमेस हजारों नागरिकांचा प्रतिसाद

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व निवडणुका मतपत्रिकाद्वारे (बँलेट) घेण्यात यावेत या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

या स्वाक्षरी मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारों नागरिकांनी स्वाक्षरी करून EVM बंद करून बँलेट वर निवडणुका घेण्यास पाठींबा व्यक्त केला.

तसेच या स्वाक्षरी मोहिमेत महाविकास आघाडीच्या घटकपक्षाचे अनेक नेतेमंडळींनी सुद्धा स्वाक्षरी करून पाठींबा व्यक्त केला.

यावेळी स्वाक्षरी मोहिमेबद्दल माहिती देताना चेतन भाऊ नरोटे सांगितले की, देशातील सामान्य नागरिकांचा आजपर्यंत मतदानावर विश्वास होता. विधानसभा निवडणुकीअगोदर अनेक सर्व्हे मध्ये सुद्धा महाविकास आघाडी सत्तेवर येणार असे चित्र होते तसेच लोकभावना सुद्धा होती. पण निवडणुकीत लोकभावनेच्या विपरीत निवडणुकीचे निकाल आले असल्याची भावना जनतेमध्ये खळबळ निर्माण केली आहे. EVM च्या मदतीने महायुती सरकार आज सत्तेवर आले आहे. या अनपेक्षित निकालास EVM मशीन घोटाळा जबाबदार असल्याचे देशातील राज्यातील सर्व मतदारांची भावना दृढ झाली आहे. जी निवडणूक यंत्रणा संशयास्पद आहे ती बंद करून मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात अशी भावना जोर धरित आहे त्या भावनेला वाचा फोडण्यासाठी मा. विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी नेतृत्वाखाली मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार प्रणितीताई शिंदे हे सर्व पक्षांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच दिनांक ०५ डिसेंबर २०२४ ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले असून प्रत्येक वार्डात, प्रभागात, चौकात, मार्केट आदी ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी जनतेच्या सहकार्याने ही मोहीम राबविणार आहोत त्याची सुरुवात आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर साक्षीने करत आहोत.

शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संजय हेमगड्डी, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, सुशीला आबुटे, देविदास गायकवाड, प्रमिला तूपलवंडे, हसिब नदाफ, बसवराज म्हेत्रे, शकील मौलवी, अशफाक बलोरगी, हणमंतू सायबोळू, उमेश सुरते, नागनाथ कदम, केशव इंगळे, युवराज जाधव, वाहिद बिजापूरे, तिरूपती परकीपंडला, जाबिर अल्लोली, रुस्तुम कंपली, महेश लोंढे, रुपेश गायकवाड, अशोक NK क्षीरसागर, शफी हुंडेकरी, कलशेट्टी, सागर उबाळे, अनिल मस्के, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, लखन गायकवाड, मधुकर आठवले, धीरज खंदारे, हेमाताई चिंचोलकर, शोभा बोबे, संघमित्रा चौधरी, दिनानाथ शेळके, हारून शेख, शिवशंकर अंजनाळकर, चंद्रकांत टिक्के, शिवाजी साळुंखे, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, सायमन गट्टू,  हाजीमलंग नदाफ, सलीम. मणुरे, चंदा काळे, वीणा देवकते, आकाश जांभळे, महादेव येरणाळ , संकेत माने, सौरभ साळुंखे, गिरीधर थोरात, शुभांगी लिंगराज, सुनंदा व्हटकर, सलिमा शेख, अशफाक बेलीफ, रफिक रामपुरे, शशिकांत जाधव, बाशिद आतकरे, वर्षा अतणुरे, निता बनसोडे, धनलक्ष्मी देशमाने, नागनाथ शावणे, हणमंतू रुपणर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी सहभागी झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments