'एस व्ही सी एस' च्या माने ला राष्टीय स्तरावर दुहेरी मुकुट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गुजरात मधील राजकोट येथे झालेल्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डायविंग प्रकारात सोलापूरच्या एम आय डी सी येथील एस.व्ही.सी.एस. प्रशालेच्या इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी मनस्वी राजशेखर माने हिने उत्कृष्ट कामगिरी करत १ मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये सुवर्ण पदक, ३ मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये सुवर्ण पदक आणि प्लॅटफॉर्म बोर्ड प्रकारात रौप्यपदक मिळवले आहे. मनस्वीच्या या यशामुळे सोलापूरचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल झाले आहे.
अशाप्रकारे एकूण 2 सुवर्ण पदक आणि १ रौप्य पदक जिंकले.तिच्या या उज्वल यशाबद्दल काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे, उपमुख्याध्यापक धनंजय नकाते व पर्यवेक्षक संतोषकुमार तारके यांनी अभिनंदन केले.
0 Comments