Hot Posts

6/recent/ticker-posts

मारकडवाडीने वात पेटवली, ठिणगी पुण्यात, EVM विरोधात आघाडीचे 11 उमेदवार सुप्रीम कोर्टात

 मारकडवाडीने वात पेटवली, ठिणगी पुण्यात, EVM विरोधात आघाडीचे 11 उमेदवार सुप्रीम कोर्टात




मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाविकास आघाडीचे पुण्यातील 11 उमेदवार उद्या ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. सर्व उमेदवार त्यासाठी आजच ही मंडळी दिल्लीला रवाना झाले आहेत. विधानसभेतील दारूण पराभवानंतर विरोधकांनी त्यातही विशेषकरून पवारांच्या राष्ट्रवादीने ईव्हीएम विरोधात आता कायदेशीर लढण्याची तयारी केली आहे.
विधानसभा 2024 चे धक्कादायक निकाल विरोधकांना अद्यापही मान्य नाहीत. ईव्हीएम मशीनमध्ये सत्ताधाऱ्यांनी 15 ते 25 टक्के मतदान आधीच सेट करून ठेवलं गेल्याने महायुतीला एवढे पाशवी बहुमत मिऴाल्याचा विरोधकाचं म्हणणं आहे. पण निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची टँम्परिंग झाल्याचं मान्य करायला तयार नाही म्हणूनच आम्ही नाईलाजास्तव सुप्रीम कोर्टात जात असल्याचं प्रशात जगताप यांनी म्हटलंय.
सुप्रीम कोर्टात पवार गट कोणते पुरावे सादर करणार?

पवार गटाने मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातला रस्त्यावरचा लढा यापूर्वीच सुरू केलाय. पण सत्ताधाऱ्यांनी पडळकर, खोत या जोडगोळीला तिकडे धाडून जशासतसे प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्याने विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचीही तयारी चालवलीय. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात पुण्यात मविआच्या पराभूत उमेदवारांची बैठकही झाली. अॅड. असीम सरोदेही त्याला हजर होते. दरम्यान, ईव्हीएम विरोधातील अनेक याचिका सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच फेटाळून लावल्यात त्यामुळे उद्या पवारांची राष्ट्रवादी नेमके कोणते पुरावे सादर करते हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय

जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झालेले असताना ईव्हीएममधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे. निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते, तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांवर संशय असून, त्यांना गावातून फारतर शे-दीडशे मते मिळायला पाहिजे होती, असे गावकऱ्यांचे म्हणणं आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments