तब्बल १० लाखांच्या बनावट नोटा जप्त, २ एजंटला ठोकल्या बेड्या, पंढरपुरात खळबळ
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात कोट्यवधींचं घबाड भरारी पथकाला सापडले होते. महिनाभरात ६०० कोटींपेक्षा जास्त मालमत्ता पोलिसांनी त्यावेळी जप्त केली होती.
आता विधानसभा निवडणुका संपताच पंढरपूरमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश झालाय. तब्बल १० लाखांपेक्षा जास्त बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील मधुकर माने यांना एजंटकडून गाई गोठ्याचे अनुदान दहा लाख रूपयांचे अनुदान मिळाले होते.
५०० रूपयांच्या नोटा घेऊन माने बँकेत गेले. त्यावेळी त्या बनावट असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी त्याबाबत पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ राजू चोरमले आणि अतुल तावरे यांना अटक केली. पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत आहे. यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का? हे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल, पण इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा मिळाल्यामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पंढरपूर शहरात पोलिसांना तब्बल दहा लाख १४ हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी राजू चोरमले आणि अतुल तावरे या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी बावनट नोटांचा पर्दाफाश केल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. पंढपुरात याआधीही असे अनेक प्रकरण घडले. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने नोटांच्या प्रकरणांचा तपास करत, भामट्यांचा पर्दाफाश केला.
पंढरपुरात पोलिसांनी बानवट नोटांचे मोठं रॅकेट उघड केले आहे. मधुकर माने यांना बनावट नोटा देत, आरोपींनी गंडा घालण्याचा प्रयत्न केला. कारवाईमध्ये पंढरपूर शहर पोलिसांनी तब्बल दहा लाख १४ हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणात शासकीय योजना मंजूर करून देणारे खासगी एजंट राजू चोरमले आणि अतुल तावरे यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. पंढरपूर शहर पोलिसांनी बावनट नोटांचा पर्दाफाश केल्यानं त्यांच्यावर कौतुकाचे वर्षाव करण्यात येत आहे.
प्रकरणाबाबात तक्रारदार मधुकर माने म्हणतात, 'आरोपींनी गाई गोठ्याचे अनुदान मंजूर झाले म्हणून दहा लाख १४ हजार ५०० रूपये दिले होते. यामध्ये ५०० रूपयांच्या २०२९ नोटांचा समावेश होता.' ही रक्कम घेऊन तक्रारदार बँकेत पोहचला, त्यावेळी सर्व नोटा बनावट असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेय. या नोटा बनावट असल्याचे समजताच माने यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसांमध्ये धाव घेतली. माने यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन जणांना अटक केली. पोलिस तपासात आरोपींकडून बनावट नोटांचा आणखी मोठं घबाड सापडण्याची शक्यता आहे.
0 Comments