परभणी व बीड अत्याचार प्रकरणी मोहोळ येथे काढण्यात
आला निषेध मोर्चा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-सकल मराठा समाज व संविधान सन्मान समिती मोहोळ यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यात असे म्हटले आहे कि, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्य व अवमानकारक विधान केलेले आहे, त्यामुळे देशातील सर्व नागरिकांचे मन दुखावलेले आहे व तीव्र नाराजी देशभर उमटत आहे म्हणून गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
तसेच परभणी येथील पोलिसांच्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन मयत झालेले शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांना एक कोटी रुपये मदत तात्काळ करावी आणि त्यांच्या कुटूंबियातील एका व्यक्तीस तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ठ करुन घेण्यात यावे. तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष, बेकायदेशीर आणि अमानवीय पध्दतीने मारहाण केलेली आहे त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत.
.
तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे त्या खुनाची एस.आय.टी.मार्फत चौकशी व्हावी व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या प्रमुख मागण्यासह मोहोळ येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात रमेश बारसकर डॉ. प्रमोद पाटील, अँड पाहूंरंग माने, शेतकरी घटना अध्यक्ष पप्पू पाटील, मनोज नागणे, नाना हावळे, मंगेश पांढरे रियाज शेख, बाबुराव ढाणके, राजू नागरिक, युसुफ भागवान, विकी कांबळे, विकास बनसोडे, संगिता पवार, सोमनाथ पवार जितेंद्र अष्टूक, संतोष कसबे, प्रविण अपूरे सतीश कसबे, सोमेश बनसोडे, बाबू सोनवणे. दादा कापूरे आदींचा सहभाग होता
0 Comments