परभणीतील घटनेवरून मातंग एकता आंदोलन आक्रमक!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मातंग एकता आंदोलन सोलापूर शहर जिल्हा वतीने परभणीत झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि पोलिसांनी आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू केलेलं कॉम्बिग ऑपरेशन थांबवणे, खोटे गुन्हे मागे घेणे, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली व त्यांना निलंबित करण्यात यावे व परभणीतील भिमसैनिक विजय वाकोडे यांनी देखील पोलीसानी मारहाण केली त्यात त्यांचा देखील मृत्यू झाला या मागणीसाठी आज मातंग एकता आंदोलन युवक सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष महेश लोंढे, शहर संपर्क प्रमुख सुरज शिंदे, कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, ओंकार पवार, उपाध्यक्ष अभी डोलारे, अजिंक्य बोराडे, सोहेल पटेल, अभिषेक पोटोळ, बंटी खंदारे, दिनेश राठोड आदी उपस्थित होते.
0 Comments