अनगर प्रशालेत आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न
अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष 2024 25 च्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अजिंक्यराणा पाटील यांच्या शुभहस्ते प्राचार्य चंद्रकांत ढोले चेअरमन तानाजी गुंड व केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ यांची उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी अजिंक्यराणा पाटील म्हणाले की विद्यार्थी दशेमध्ये खेळ आणि व्यायाम याला अनन्य साधारण महत्त्व आहे आपली प्रकृती उत्तम राहायची असेल तर आहार विहार आणि व्यायाम याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आजच्या मुलांच्या प्रकृती बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि शिक्षक आणि पालक यांनी विद्यार्थ्यांच्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज त्यांनी नमूद केली
यावेळी मान्यवरांचे शुभ हस्ते सरस्वती व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल तानाजी गुंड यांचा सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्ती निमित्त केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ यांचाही अजिंक्यराणा पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी केले. तर यावर्षीचा शैक्षणिक क्रीडा अहवालाचे वाचन उपप्राचार्य महादेव चोपडे यांनी केले. यावेळी मोनाली भोसले यांनी खेळाडूंना शपथ दिली
खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांनी क्रीडा ज्योत पेटवून क्रीडांगणाला मानवंदना दिली
यावेळी सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील प्राचार्य चंद्रकांत ढोले उपप्राचार्य महादेव चोपडे पर्यवेक्षक माधव खरात क्रीडा शिक्षक दाजी गुंड बब्रुवान बोडके, रवी बोडके, चंद्रकांत सरक, अर्चना गुंड, अंकुश शिंदे, तात्या गायकवाड, हरी शिंदे, पंढरीनाथ थिटे, आदी क्रीडा शिक्षक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर सोमनाथ ढोले यांनी आभार मानले
0 Comments