Hot Posts

6/recent/ticker-posts

वाळूज प्रशालेत क्रीडा महोत्सवास प्रारंभ

 वाळूज प्रशालेत क्रीडा महोत्सवास प्रारंभ




मसले चौधरी (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील वाळूज प्रशालेत क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापक गोवर्धन ताकभाते यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.तर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विद्यार्थी खेळाडू शपथ घेऊन प्रामाणिकपणे व खेलाडू वृत्तीने स्पर्धा पार पाडण्याची शपथ घेतली.
        या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे,400 मीटर धावणे, रिले, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी,खोखो कबड्डी, क्रिकेट, व इतर मनोरंजनाचे खेळ असे विविध प्रकारचे खेळ घेतले जाणार आहेत असे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक गोवर्धन ताकभाते यांनी सांगितले.
    या स्पर्धेत पंच म्हणून रावसाहेब पाटील,श्रीकांत हजारे, संजयकुमार राजगुरू, दिनेश नरळे, अजय पवार, क्षितिजा कदम काम पाहणार आहेत. याप्रसंगी शरद पवार गोरख परीट सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments