जिल्हा लेबर फेडरेशनच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू-मोहोळचे माजी आ.राजन पाटील ग्वाही
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या ३५ वर्षापासून मोहोळ तालुक्यातील सहकारी मजूर सोसायट्यांनी बिनविरोध संचालक निवडून देण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळाच्या अवस्थेतही सभासदांच्या रास्त सूचनेनुसार संचालक मंडळाला विश्वासात घेऊन सदस्यांना सतरंजीच्या स्वरूपातील भेट देण्याचा उपक्रम निश्चितपणे अन्य सहकारी संस्थांना प्रेरणादायी आहे. या पुढील काळातही सहकारी मजूर सोसायटी आणि जिल्हा फेडरेशन यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू,अशी ग्वाही मोहोळचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली. मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.यावेळी ते पुढे म्हणाले की, मोहोळ तालुक्याने ऐकेकाळी अध्यक्षपद देखील भूषवले आहे. शासनाच्या विविध नियमावलीमुळे मजूर सोसाट्यांवर अप्रत्यक्षरीत्या काम वाटपाच्या बाबतीत दुर्लक्ष होत आले आहे. त्यामुळे गेल्या काही दशकापूर्वी जशी परिस्थिती सहकारी मजूर सोसायटी जिल्हा फेडरेशनची होती तशी आता नाही. यावेळी चेअरमन शंकर चौगुले, व्हाईस चेअरमन चंद्रकांत अवताडे, भारत सूतकर, बालाजी साठे, नागेश साठे, प्रमोद डोके, दत्ता पवार, विकास पाटील, काकासाहेब जगताप,मोहन होनमाने, नागेश बिराजदार, विजय कोकाटे, तात्या पाटील, प्रशांत बचुटे, संभाजी शेळके, शिवाजी चव्हाण उपस्थित होते.
0 Comments