Hot Posts

6/recent/ticker-posts

हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूलचे स्नेहसंमेलन

 हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूलचे स्नेहसंमेलन




मार्डी (कटूसत्य वृत्त):-  नान्नज येथील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले.नान्नजच्या सरपंच राणी टोणपे, संस्थेचे चेअरमन अनिल विपत, सेक्रेटरी वनिता मकेनझी, स्टीवन डेविड, सेक्रेटरी प्रफुल्ल काळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी रेवरंड इम्यानुअल म्हेत्रे, तालुक्याचे केंद्रप्रमुख पीरसाब चौधरी, शाळेचे खजिनदार फिलिप नदवी, मुख्याध्यापक एस्तेर विनायकुमार, उपमुख्याध्यापक स्नेहल मसीह, समन्वयक विश्वास भास्कर, संस्थेचे मॉडरेटर स्टीवन सी डेव्हिड, सेक्रेटरी प्रफुल्ल कपूर्व आदी उपस्थित होते. वेस्टर्न डान्स, ख्रिस्त जन्मोत्सव नाटिका,नाटकातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन विश्वास भास्कर यांनी स्वप्नपूर्ती या नाटकातून कितीही मोठे झाला तर वडिलांचे वचन मोडू नका, पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात आणि आत्मविश्वास ठेवून वाटचाल केली तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, हे संदेश दिले. या नाटकाने पालकांची मने जिंकली.त्यासाठी महिनाभर शाळेचे समन्वयक विश्वास भास्कर यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन नान्नज येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जीवाचे रान करून नाटकाची तयारी केली. रिबन डान्स, एज्युकेशनल थीम डान्स, रेट्रो डान्स, हॉरर डान्स, शेतकरी नृत्य, शेतकरी
जीवनावर आधारित स्वप्नपूर्ती नाटक तसेच देशभक्ती गाण्यांवर नृत्य, तबला वादन असे विविध बहारदार कार्यक्रम सादर झाले.



Reactions

Post a Comment

0 Comments