Hot Posts

6/recent/ticker-posts

मारुती शहाणे यांना पीएच.डी. प्रदान

मारुती शहाणे यांना पीएच.डी. प्रदान



कुलपती डॉ. इन्दु भूषण मिश्रा यांच्या हस्ते इंदौर येथे पीएच.डी. प्रदान

     सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हरिभाई देवकरण प्रशालेचे पर्यवेक्षक तथा तंत्रस्नेही शिक्षक मारुती शहाणे यांना भारत सरकार मान्यता प्राप्त पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा यांच्यामार्फत शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात महत्वपूर्ण समजली जाणारी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
       शहाणे यांनी शैक्षणिक, साहित्य, सृजनशीलता व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची विशेष दखल घेत पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, मथुराचे कुलपती डॉ. इंदू भूषण मिश्रा यांच्या शुभहस्ते इंदौर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  देवेन्द्रकुमार जैन (सेवानिवृत्त न्यायाधीश, म.प्र. शासन, भोपाळ),  विष्णुकांत कनकने (प्रदेश प्रभारी, मुख्यमंत्री उदय योजना, तकनीकी शिक्षा विभाग, म.प्र. शासन, भोपाल), डॉ. उमा शंकर नगायच (सचिव, मध्य प्रदेश बाल अधिकार संरक्षण आयोग, म.प्र. शासन, भोपाल), सुश्री दीपा मिश्रा, डॉ. विश्वनाथ पाणिग्रही इ. मान्यवर उपस्थित होते .
         मारुती शहाणे हे 'सर फाउंडेशन' सोलापूर शहर समन्वयक म्हणूनही काम पाहतात. त्यांच्या मार्गदर्शनातून आजपर्यंत अनेक राज्य, राष्ट्रीय पातळीवर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केले आहे. याशिवाय अनेक शैक्षणिक व सामाजिक, सांस्कृतिक संघटनेत उत्तम कार्य करीत आहेत. या यशाबद्दल त्यांचे जिल्हा व राज्यातील संघटना आणि संस्थेच्या शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापिका  फाटक, सर्व पर्यवेक्षक व शिक्षकवृंद यांसह सर्व स्तरांमधून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

 

Reactions

Post a Comment

0 Comments