मोहोळ (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीत सर्वांनी गट- पक्ष भेद विसरून
माझ्या विजयासाठी एकत्र येऊन काम केले त्याच धर्तीवर येत्या काळात मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असेच एकदिलाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. मोहोळची जागा
महायुतीमुळे राष्ट्रवादीला सुटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊनच मी
महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली आणि यशस्वी झालो. त्यामुळे गेल्या ३४ वर्षाच्या राजकीय प्रवासातील साथ आणि सोबत ना. शिंदे यांना विसरणार नाही.ते नक्कीच मोहोळ शहर आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका कायम ठेवतील, असा मला विश्वास वाटतो,
असे प्रतिपादन मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केले.मोहोळ शहरातील नाईकवाडी नगर येथील नागरी सत्काराला उत्तर देताना आ. खरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेश पाटील, रमेश बारसकर, चरणराज चवरे, विक्रम देशमुख,नाईकवाडी नगर येथे आ. खरे यांचा नागरी सत्कार राजाभाऊ रसाळ, चंद्रकांत गोडसे, सत्यवान देशमुख, सरफराज सय्यद इत्यादी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.खरे पुढे म्हणाले की, मोहोळ शहराच्या जनतेच्या पाठबळामुळेच मी पंधरा हजाराचा लीड सुरुवातीला घेतला आणि शेवटपर्यंत हा लीड तीस हजार जाऊन विजयी झालो. त्यामुळे मोहोळच्या जनतेने दिलेले मताचे पवित्र दान पूर्ण आयुष्यात विसरणार नाही. हजारो कोटींचा निधी आणल्याच्या वल्गना करणाऱ्या यापूर्वीच्या आमदारांच्या कालावधीत मोहोळ शहराला दुष्काळात पाण्यासाठी वन वन भटकावे लागले. सतरा टँकरच्या माध्यमातून मी पाणी दिल्यामुळे पाणीवाला दादा म्हणून येथील मायबाप बंधू-भगिनींनी मला मतदान भरभरून दिले. ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, सीमाताई पाटील, बाळासाहेब गायकवाड, महेश देशमुख यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करून मला विजयी केले.यापुढील काळातही मोहोळ शहराच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मी या विजयानंतरच्या संधीचे नक्कीच सोने
करून सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहणार असल्याचे आ. खरे म्हणाले.
पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी
शहर बकाल केले मोहोळ शहराच्या विकासासाठीचा पुढील पन्नास वर्षांचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करून त्या दृष्टीने विकासाचे नियोजन केले जाईल. यापूर्वीच्या आमदाराने मोहोळ शहराच्या फायद्याचे कमी आणि स्वतःच्या फायद्याची निर्णय घेऊन शहर बकाल केले. त्यामुळेच संतापाचा उद्रेक होऊन मला सर्वसामान्यांनी मतदान केले. यापुढील काळात शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मोहोळ मतदारसंघासाठी ना.एकनाथ शिंदे यांच्या समवेत कार्यरत राहावे आणिना. अजित पवार यांच्या समवेत उमेश पाटील यांनी कार्यरत राहावे. दोघांनी सदैव प्रयत्नशील राहून माझ्या लोकप्रतिनिधी पदाच्या कर्तव्याला मनापासून साथ द्यावी आणि मोहोळच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करावे.
- राजू खरे, आमदार, मोहोळ
0 Comments