लग्नाला येतो ; कोपर्डीतील पीडीतेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हजेरी
शिरूर तालुका येथील टाकळी हाजी येथे शुभविवाह संपन्न
शिरूर (कटूसत्य वृत्त):- शिरूर तालुका येथील टाकळी हाजी येथे कर्जत मधील कोपर्डी येथील सुद्रिक कुटुंबातील मुलीचा विवाह निघोज येथील वराळ कुटुंबातील मुलाशी संपन्न झाला या लग्नाला सोयीचे ठिकाण म्हणून लग्न शिरूर येथील टाकळी हाजी येथे ठेवण्यात आले
सुमारे आठ वर्षांपूर्वी कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता त्यावेळेस या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते त्यातूनच पुढे मराठा आरक्षणाचा लढा अधिक ठोकदार झाला नंतर निघालेले मराठा क्रांती मोर्चा आणि त्यानंतर अलीकडे सुरू झालेले मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलन या सर्व प्रवासात आंदोलकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून पीडित मुलीच्या वडिलांना दिलेला शब्द पूर्ण करत पिडीतिच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावत एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला
नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती टाकळी हाजी आहे या गावात रविवारी दुपारी हा साधा पद्धतीने शुभविवाह सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली
कोपर्डी येथील घटना घडल्यापासून सातत्याने पिडीतिचे वडील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर नेहमी संपर्कात होते दरम्यानच्या काळात भय्यूजी महाराज यांच्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले होते त्यामुळे सुद्रिक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते व मी लग्नाला नक्की येणार असा शब्द फडणवीस यांनी पीडीतेच्या वडिलांना दिला गेला होता या शुभविवाहासाठी मोठ्या फौज फाट्यासह मुख्यमंत्री यांनी हजेरी लावत मोठा संदेश दिला
या सोहळ्यासाठी प्रामुख्याने मा खासदार सुजय विखे पाटील आमदार राम शिंदे प्रवीण दरेकर आ. पोपटराव गावडे यांच्यासह राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments