विमान कंपनी व प्रशासनाकडून पेट्रोल पंपाची मागणी करून सोलापूरकरांची केली चक्क फसवणूक
खुद्द मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यात टँकरने विमानात भरले जाते इंधन
पुणे (कटूसत्य वृत्त):- २३ डिसेंबर पासून सोलापूर ते गोवा व मुंबई अशी सुरू होणारी फ्लाय ९१ या विमान कंपनीची विमानसेवा कंपनीने सोलापूर विमानतळावर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंप नाही व धुके आहे.
ही कारणे देऊन चक्क तमाम सोलापूरकरांची फसवणूकच केलेली आहे.आज सुद्धा पुणे येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमान टर्मिनल वर विमानांमध्ये चक्क टँकरच्या साह्याने इंधन भरले जाते. नागरी उद्ययन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यात जर विमानतळावर पेट्रोल पंप नाही व धुके नाही तर सोलापूर मध्ये ही कारणे पुढे करून या विमान कंपनीने व प्रशासनाने सर्व सोलापूरकरांची दिशाभूल केलेली आहे हे उघड झाले आहे.निवडणुकीच्या तोंडावर विमानसेवा सुरू करणार अशा अफवा पसरवून मते मिळवण्याचा हा एक अत्यंत लाजिरवाणा प्रकार मुरलीधर मोहोळ व राज्यकर्त्यांनी केलेला आहे.
या गोष्टीचा जाब लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला कोण विचारणार? असे सोलापूर विचार मंचचे डॉ.संदीप आडके यांनी सांगितले.
0 Comments