महाकुंभमेळयाच्या भविकांकरिता न्यासाकडून २५० ताट व २५० कापडी पिशव्या
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच न्यास हे धार्मिक गती विधीला महत्त्व देऊन कार्यरत असून,त्याप्रमाणे प्रयागराज महाकुंभमेळया करिता येणाऱ्या भविकांकरिता मंडळाकडून २५० ताट व २५० कापडी पिशव्या देण्यात आल्या.
प्रयागराज उत्तर प्रदेश येथे होत असून,या महाकुंभ मेळाव्यासाठी "एक थाली, एक थैला" अभियाना अंतर्गत न्यासाकडून २५० ताट व २५० कापडी पिशव्या न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते जिल्हा पर्यावरण गतिविधि यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे निसर्गात प्लास्टिक व पत्रावळी यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो तो टाळण्याकरता ही उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा पर्यावरण प्रमुख प्रवीण तळे, पर्यावरण पालक सुशील हेरस्कर, निसर्ग सेवा फाउंडेशन प्रमुख सुनील बिराजदार,मल्लम्मा पसारे,विद्याधर गुरव, महेश वागदरे, तम्मा शेळके, रवी वाघमोडे ,प्रमोद लोकापूरे,संदिप कटकधोंड व न्यासाचे सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब घाडगे, बाबूशा महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, सिद्धाराम कल्याणी, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, एस.के.स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments