Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ मध्य तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

 मोहोळ मध्य तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- संविधान सन्मान समिती मोहोळ तालुका व सकल मराठा समाजाच्यावतीने शासनाच्या नाकर्तेपणा -विरोधात विविध मागण्यांसाठी मोहोळ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तहसीलदार सचिन मुळीक व पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना निवेदन दिले.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, परभणी येथील पोलिसांच्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन मयत झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत तत्काळ करावी,त्यांच्या घरातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करुन घेण्यात यावे. तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुप, बेकायदेशीर आणि अमानवीय पध्दतीने मारहाण केलेली आहे, त्यांना सेवेतून बडतर्फ करुन गुन्हे दाखल करा, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे त्या खुनाची एस.आय.टी. मार्फत चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा दया. या प्रमुख मागणी करीता संविधान सन्मान समिती मोहोळ तालुका व सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी रमेश बारसकर, अॅड. विनोद कांबळे,बिलाल शेख, अॅड. श्रीरंग लाळे, डॉ. प्रमोद पाटील,संगीता पवार, अॅड. पांडुरंग माने, अॅड. प्रेमनाथ सोनवणे, अॅड. हिंदुराव देशमुख, किशोर पवार, पांडुरंग खांडेकर, युवराज रणदिवे, पप्पू पाटील, मंगेश पांढरे, रियाज शेख, सोमनाथ पवार, राजू नाटिळक, युसुफ बागवान, पांडुरंग जवंजाळ, तानाजी खिलारे, जिब्राईल शेख आदी नागरिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments