अहिंसा सेवा समिती व पोलीस ठाणेच्या वतीने वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यास सुरुवात
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- साखर कारखाना गळीत हंगाम सुरू झाला असून शेत ते ऊस कारखाना असे वाहनांचे रस्त्यावरून ये जा सुरू आहे त्यामुळे ऊस वाहतूक वाहनासह इतर वाहनेही सुरक्षित व अपघात मुक्त पार पाडण्यासाठी अहिंसा सेवा समिती, नातेपुते व नातेपुते पोलीस स्टेशन, नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे अहिंसा सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अविनाश दोशी यांच्या हस्ते ऊस वाहतूक वाहन व इतर वाहनांना मोफत रिप्लेकटर, रेडियम लावण्याच्या सप्ताह उपक्रम करण्यात आला असून १००० हजार वाहनांना रिप्लेक्टर रेडियम लावण्यात आले आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर बसवल्याने अपघात अनर्थ टळणार असल्यामुळे हे वाहनांना बसवलेले रिप्लेटर ठरते आहे नवसंजीवनी दररोज ५०० ते १००० वाहनांना रिप्लेक्टर रेडियम लावण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक अविनाश दोशी यांनी दिली. यावेळी साहेब पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, महावीर दोशी, अभिनंदन दोशी, पोलीस कॉन्स्टेबल सुधीर हंगे, गणेश कुलकर्णी, समाधान मोहिते, संतोष वारे उपस्थित होते.
वाहनांवर ऊस लादताना उंची मर्यादित ठेवावी, कारण उंची वाढल्यास वाहन उलटण्याचा धोका निर्माण होतो, ट्रॅक्टर-ट्रेलरची एकत्रित लांबी १८ मीटरपेक्षा अधिक असू नये. मोठ्या आवाजाचे स्पीकर वाहनांवर लावणे टाळावे, कारण त्यामुळे इतर वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.वाहनचालकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहतूक करावी आणि वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवून चालवावे. वाहनाची वेग मर्यादा पाळावी
महारूद्र परजणे
सहाय्यक पोलीस निरिक्षक नातेपुते पोलीस ठाणे
0 Comments