Hot Posts

6/recent/ticker-posts

गादेगांव पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत शासनाच्या पशुगणनेला सुरुवात

गादेगांव पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत शासनाच्या पशुगणनेला सुरुवात



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देशासह राज्यात दर पाच वर्षांनी पशु गणना केली जाते. सन २०१९  मध्ये २०  वी पशु गणना झाली होती. ही पशु गणना २५  नोव्हेंबर पासून सुरू झाली असून २८   फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार ही  २१ वी पशु गणना आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मोबाईल ॲप द्वारे केली जाणार आहे. त्यानुसार प्रगणक एकूण १६  जातींच्या पशुंची गणना करणार आहेत, यासाठी नागरिकांनीही पशुगणनेला सहकार्य करावे असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कोळेकर यांनी केले आहे. सर्व पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक व योग्य माहिती द्यावी. हा राष्ट्रीय उपक्रम आहे. यातून धोरण ठरणार असून त्याचा पशुपालकांनासुद्धा फायदा होणार आहे. यासाठी गादेगांव पशुवैद्यकीय दवाखान्या करता सुरज साळुंखे यांची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आज या पशु गणनेची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय गादेगांव येथे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिनिधी बालाजी बागल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, मनसेचे अनिलआप्पा बागल, ग्रामसेवक जयंत खंडागळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कोळेकर, प्रगणक सुरज साळुंखे, प्रगतशील शेतकरी प्रशांत पप्पू पाटील, माजी उपसरपंच भजनदास पवार, राजेंद्र हुंडेकरी, विकास बागल, लक्ष्मण कांबळे, ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळासाहेब वाघमारे, कर्मचारी सोमनाथ धोत्रे, राहुल बंदपट्टे आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Reactions

Post a Comment

0 Comments