Hot Posts

6/recent/ticker-posts

राम सातपुते यांच्या उपस्थितीत अकलूज येथे भाजपच्या पाच शाखांचे उद्घाघाटन

 राम सातपुते यांच्या उपस्थितीत अकलूज येथे भाजपच्या पाच शाखांचे उद्घाघाटन



 माळशिरस (कटूसत्य वृत्त):- माळशिरसचे मा आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज येथील ऐतिहासिक विजय चौकातील भारतीय जनता पार्टीच्या नूतन शाखेसह 5 शाखांचे उद्घघाटन करण्यात आले. अनेक राजकीय घटनांचा साक्षीदार असणाऱ्या विजय चौकात भाजपने प्रथमच शाखा उद्घाटन केल्याने राजकीय जाणकारातून अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.

 यावेळी भाजपाचे माळशिरस तालुका अध्यक्ष ॲड मदने ,आप्पासाहेब देशमुख, रंजन गिरमे ,सुजयसिंह माने पाटील, सोपान नारनवर, बाजीराव काटकर, ॲड बी वाय राऊत ,जयराज माने पाटील ,बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे ,अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, सोनू पराडे, दादासाहेब उराडे, संजय देशमुख, लक्ष्मण गोरड, महादेव पवार, शिवराज पुकळे, रणजीत मोटे, सुरेश तरंगे, राहुल पद्मन, शशी कल्याणी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   नुकत्याच माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपचे मा आमदार राम सातपुते यांनी आपल्या विकास कामाच्या जोरावर माळशिरस तालुक्यातून जवळपास एक लाख दहा हजार मतदान मिळविले. मा आ राम सातपुते यांचा या निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेल्या मताधिक्याची चर्चा सर्वत्र होत असून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आगामी काळातील माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका या मा आ राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे नुकतेच माळशिरस तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यात अकलूज येथूनच भाजपाच्या नवीन पाच शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
   यावेळी अकलूज येथील विजय चौकातील शाखेच्या अध्यक्षपदी संतोष अडगळे ,उपाध्यक्षपदी अमर खंडागळे, आंबेडकर चौकातील शाखेच्या अध्यक्षपदी राहुल लोंढे, उपाध्यक्षपदी शुभम वाघमारे, होनमाने प्लॉट शाखेच्या अध्यक्षपदी ओंकार चंदनशिवे ,उपाध्यक्षपदी सागर थोरात ,समता नगर शाखेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण सदाफुले ,उपाध्यक्षपदी मनोज घोडके तर पंचवटीनगर शाखेच्या अध्यक्षपदी महेश घाडगे, उपाध्यक्षपदी गौरव घोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
   आमचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज आणि परिसरातील सर्वच ठिकाणी भाजपच्या नूतन शाखा उद्घघाटन करून भाजपाची ध्येयधोरणे व विकास कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणार असून माळशिरस तालुक्यातील गावागावातील वाडी वस्तीवर भाजपाच्या शाखांचे उद्घाटन करणार आहे .
          मा आमदार राम सातपुते

Reactions

Post a Comment

0 Comments