व्यवस्थेचा झाला विजय महाराष्ट्राच झाले पराजय: सुदीप चाकोते.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी आपल्या कार्यालयात काँग्रेसच्या निवडक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे बैठक घेतली. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रभागातून व मतदार संघातून दररोज वीस ते पंचवीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वेगवेगळी बैठक घेऊन त्यांचे समस्या व अडचणी जाणून घेऊन दूर करण्यात येणार आहे व पुढील महिन्यात एक मोठा मेळावा काँग्रेस सेवादल च्या वतीने घेणार आहे.
यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले की.नुकतेच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या अनाकालनीय निकालानंतर ईव्हीएम मशीन सहित व्यवस्थेचा निषेध करतो. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेची विश्वासघात करत सत्तेच्या लाचारीसाठी सर्व सरकारी यंत्रणा व्यवस्थेचा गैरवापर करून सत्तेत आलेल्या या हुकूमशाही महायुती सरकारचे तीव्र निषेध.काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खचून जायचं कारण नाही आम्ही सर्व संघटित होऊन येणाऱ्या महापालिका निवडणूक असो जिल्हा परिषद,पंचायत समिती, सर्व निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत.आणि ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशात आमचे पक्षश्रेष्ठी चे आदेश देतील त्या अनुषंगाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.पुन्हा एकदा सोलापूर काँग्रेसमय झाल्याशिवाय कार्यकर्त्यांनी स्वस्त बसू नये. असे आव्हान केले. यावेळेस माजी नगरसेविका वीणाताई देवकते, नूरअहमद नलवार, मल्लिनाथ सोलापूरे, संजय कुऱ्हाडे, श्रीकांत दासरी, कयूम बलौलखान, शंकर भोसले, मंजुळे, रेखाताई बेनेकर, श्रीकांत दासरी रविकांत पाटील, बोरुडे, आकाश टिपराधी, चंद्रकांत टिक्के, जब्बार शेख आदी उपस्थित होते.
0 Comments