Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुतेतील विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू

 नातेपुतेतील विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहरातील श्री विठ्ठल मंदिरात सोमवार (ता. २) पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. याची प्रेरणा वै. ह.भ.प. मनोहर महाराज भगत हे आहेत.कीर्तन सेवा पुढीलप्रमाणे : सोमवारी ह.भ.प. दत्तात्रय महाराज गलांडे यांची कीर्तनसेवा झाली. मंगळवारी (ता. ३) गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले. बुधवारी (ता. ४) जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, गुरुवारी (ता. ५) रामायणाचार्य ह.भ.प. अशोक महाराज जाधव, शुक्रवारी (ता. ६) ह.भ.प. गणेश महाराज भगत, शनिवारी (ता.७) जोग शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यापक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे (माऊली), रविवारी (ता. ८) सकाळी नऊ ते ११ काल्याचे कीर्तन संत वीर युवकमित्र बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.या सप्ताहात गायनाचार्य बाबूराव महाराज शेकापुरे, मृदंगमणी ओंकार महाराज शेकापुरे, हरिपाठ नंदकुमार महाराज मोरे, काकडा अक्षय महाराज वांझे आदींची सेवा होणार आहे.काकडा आरती पहाटे पाच ते सात, महिला भजन दुपारी चार ते पाच, हरिपाठ सायंकाळी पाच ते सहा, कीर्तन सायंकाळी आठ ते १० या वेळेत होणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments