Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षि कारखान्याचे सहवीज प्रकल्पास "उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" पुरस्कार जाहीर

 सहकार महर्षि कारखान्याचे सहवीज प्रकल्पास "उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" पुरस्कार जाहीर




अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडीया यांचे वतीने सन २०२४ चा "उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" पुरस्कार जाहीर झाला आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक,महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे.यापूर्वीही सहकार महर्षि कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
     सहकार महर्षि कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांचा मोठा विश्वास असून चालू गळीत हंगामात १० लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.ऊस गाळपा बरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.या कामगिरीची दखल घेऊन को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी "उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" पुरस्कार जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.राजेंद्र चौगुले यांनी दिली.को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडीया यांचे वतीने सन २०२४ चा "उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" पुरस्कार जाहीर झाल्याने कारखान्याचे संचालक, कार्यक्षेत्रातील सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कामगार तसेच हितचिंतक यांचेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments