Hot Posts

6/recent/ticker-posts

माळीनगर येथे कृषीकन्यांचे वतीनेमाती परीक्षण शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 माळीनगर येथे कृषीकन्यांचे वतीनेमाती परीक्षण शेतकऱ्यांना मार्गदर्शन   



    

माळीनगर (कटूसत्य वृत्त):- माळीनगर (ता. माळशिरस) परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक फायदेशीर माती परीक्षण करणे ही काळाची गरज याबाबत अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण भागामध्ये जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत माळीनगर परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

माती परीक्षणासाठी नमुना शाखीय पद्धतीने कसा घ्यावा, ते करत असताना कोणती काळजी घ्यावी याची प्रात्यक्षिक घेतले. वर्षानुवर्षे पीक लागवडीमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे या यासाठी मातीत कोणती मूलद्रव्य कमी आहेत याची माहिती माती परीक्षणाद्वारे मिळते. या उपक्रमासाठी सरपंच अनुपमा एकतपुरे व ग्रामस्थ यांनी उपस्थिती दर्शवली. या उपक्रमासाठी प्राचार्य आर.जी. नलवडे ,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा एम एम चंदनकर ,कार्यक्रम अधिकारी प्रा एच एच व्ही कल्याणी ,रा. एस. आर .आडत (मृदा शास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभाग) यांनी मार्गदर्शन केले .माती परीक्षणाचे महत्त्व कृषी कन्या प्राची जाधव, ईशा घोगरे ,प्रणाली यादव ,स्नेहल तांबोळकर ,कोमल लाड, प्रतीक्षा हेगडे ,सोनाली गायकवाड ,जिजाऊ बरडे, प्रतीक्षा बनसोडे यांनी माळीनगर परिसरातील शेतकऱ्यांना पटवून दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments