इस्लामपूरात मोठ्या थटामटात संपन्न झाला
श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराचा कलशारोहन
सिद्धनाथाच्या नावाने चांगभलच्या जयघोषात,कलशावर केली पुष्पवृष्टी...
अकलूज (कटूसत्य वृत्त):-इस्लामपुर येथे श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात संपन्न झाला.इस्लामपूर येथील सर्व ग्रामस्थ व माने देशमुख परिवार एकत्रित येत दि २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर या तीन दिवसामध्ये विविध धार्मिक विधी सह श्री सिद्धनाथ जोगेश्वरीच्या नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ,कलशारोहन करण्यात आले.या निमित्ताने ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक,देवता स्थापना,मूर्ती व कलशाला जलाधिवास,धान्य दिवस,नवग्रह स्थपना, काकडा,प्रवचन,किर्तन,हारी जागर असे विविध धार्मिक विधी व कलाशारोहन ह.भ.प.रविंद्र महाराज सिद्धनाथ मठ म्हसवड यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमास आमदार उत्तमराव जानकर,मा.पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील.सहकार महर्षी साखर कारखाना संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील,संजय काका देशमुख नातेपुते,अमरभाऊ देशमुख वेळापूर,ह भ प धैर्यशील भाऊ देशमुख,मच्छिंद्र पवार, डॉ.रामदास देशमुख, गौतम माने, संग्रामसिंह रणनवरे, बाळासाहेब माने देशमुख, साहेबराव देशमुख, लक्ष्मण पवार, कुलदीप देशमुख पी एस आय , विठ्ठल नारायण पवार,रामचंद्र देशमुख,भानुदास पवार,रत्नशिव पवार,हनुमंत पवार,चंद्रकांत दाते काका,आनंद शेंडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरास आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.धार्मिक विधीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आला यांचा हजारो भाविकांनी याचा आस्वाद घेतला.कार्यक्रमास गावतील माहेरवासनी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.त्यांना गावच्या वतीने साडी देऊन सन्मान करण्यात आला.३० वर्षा नंतर गावामध्ये ग्राम दैवत व कुलस्वामिनी मंदिराचा कार्यक्रम पार पडल्याने सर्वाच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता.लहान पासून आबालवृद्ध पर्यंत सर्वांनी प्रत्येक कार्यक्रमात हिर हिरीने भाग घेतल्याने हा भला मोठा धार्मिक सोहळा यशस्वी पार पडला.
१९९४ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच ठरवल होत यासाठी तथकालीन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन सभामंडप मंदिरास दिले.मात्र इतर मंदिर बांधकाम आडचण आल्या नंतर ते थांबल त्यानंतर २०२३ साली माने देशमुख परिवार पुढाकार घेऊन सुमारे 31 लाख रुपये लोकवर्गणी जमा करून राहिलेलं कामकाज पूर्ण केल.१९९४ साली विदर्भ कोकण ग्रामीण बँक इस्लामपूर शाखेत ठेवलेलं मच्छिंद्र पवार व रामचंद्र देशमुख या दोघांच्या सयुक्त खात्यामध्ये 63 हजार रुपये ठेव ठेवली होती.त्याचे २०२४ साली 5 लाख 60 हजार रुपये मिळाल्याने हा कलशारोहन कार्यक्रम करण्यास मदत झाली.तसेच माने देशमुख व ग्रामस्थांनी सढळ हाताने आर्थिक मदत केल्याने संपूर्ण कार्यक्रमाच आर्थिक नियोजन पूर्ण झाल.कार्यक्रमाच्या प्रास्तविकात बोलताना धनंजय देशमुख यांनी मंदिराच्या उर्वरित विकास कामासाठी आमदार उत्तमराव जानकर व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचेकडे निधीची मागणी केली.यावेळी उपस्थित आमदार उत्तमराव जानकर व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी निधी देण्याची ग्वाही दिली
0 Comments