नातेपुते एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूल ची बारामती कृषी विज्ञान केंद्राला क्षेत्र भेट
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- स्कूलचे संस्थापक अध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या कृतीतून शिक्षण घेणे ही संकल्पना समोर ठेवून संस्थेचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे एस एन डी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या इयत्ता ७ वी ते ९ वी च्या १५० विद्यार्थी यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत एकदिवसीय क्षेत्र भेट दिली. प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांनी सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरला भेट दिली. त्यादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध खेळाच्या उपकरणांना असणाऱ्या विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्या. त्याचबरोबर इनोव्हेशन लॅबमधील नावीन्यता पूर्ण उपक्रम व त्यामागील तर्कशास्त्र समजून घेतले.तसेच खेळताना विज्ञान या संकल्पनेतून लंबवर्तुळाकार कॅरम, रोलिंग बॉल, मॅजिक वॉटर टॅब, रिसिंग बबल, यामागील विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मत्स्य सेवा केंद्राला भेट दिली, त्यादरम्यान त्यांनी माशांची अंडी उबवण्याची प्रक्रिया, पाण्यातील बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे क्रिएटिव्ह माशांसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रक्रिया, माशांचे खाद्य याविषयी जाणून घेतले. प्राचीन काळातील भाजीविक्रेत्या स्त्रिया व आधुनिक काळातील मॉलमध्ये जाऊन खरेदी करणाऱ्या स्त्रिया यातील फरक जाणून घेतला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक पशुपालनाची माहिती घेतली.
व्ह इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी यांनी एकदिवन असताना विविध फळे व फळभाज्या यांच्यावर केलेल्या प्रयोगाची माहिती घेतली. शेती व्यवसायाशी संबंधित असणारा कुक्कुटपालन हा ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय असून, त्यामधील विविध कोंबड्यांच्या जातीविषयी माहिती घेतली. तसेच मधुबन या ठिकाणाला भेट देताना मधमाश्या पालन पोषण व मधनिर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली.कदिवसीय क्षेत्र भेट दिली. यावेळी प्राचार्य संदिप पानसरे, सायन्स विभागाचे आदित्य दाभोळे, संस्थेचे पी आर ओ मनोज राऊत, भैय्यासाहेब भागवत, रूपाली सावंत, सावित्रा पिसे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments