नेताजी प्रशालेत 'हर घर संविधान' उपक्रम उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 7, 2024

नेताजी प्रशालेत 'हर घर संविधान' उपक्रम उत्साहात

नेताजी प्रशालेत 'हर घर संविधान' उपक्रम उत्साहात


सोलापूर(कटूसत्यवृत्त):-नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त 'हर घर संविधान'उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, ज्येष्ठ शिक्षक संगप्पा दसगोंडे याच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, विठ्ठल कुंभार, प्रकाश कोरे,षडाक्षरी हिरेमठ उपस्थित होते.कावेरी नागठाण गायत्री माशाळ, दिव्या भंडारी, रत्नकला नागठाण, निर्जला म्हेत्रे, अनुष्का तुळशीगार स्नेहल लगशेट्टी,श्रेया नायकोडी, सारिका मोतकुर,राज रचा, गौतम येमूल, बसवराज जेटगी, आदर्श बुरेल, विवेक तुळशीगार, रघुनंदन गडगी, गणेश मुसळे,आदित्य बोद्दुल, प्रज्वल गुत्तीकोंडा,अथर्व कोंकत्ती, जगदीश पोगूल, भावेश कारमपुरी, सिद्धिविनायक दूधभाते व विघ्नेश पिडगुंडे आदी विद्यार्थ्यांनी हर घर संविधान या उपक्रमात सहभाग घेतला.संविधान आपले आहे कसे ? ,सर्वांना न्याय देईल असे.संविधानाने दिला मान, स्त्री-पुरुष एक समान. संविधानाचा विचार काय ? स्वातंत्र्य, समता, बंधुता , न्याय. संविधान देते समान पत, एक व्यक्ती - एक मत.घरात कोणत्याही धर्माचे, समाजात मात्र संविधानाचे.अत्याचार -जुलूम नष्ट करा, संविधानाचा ध्यास धरा. भारताचा अभिमान, संविधान ! संविधान !.समाजाला जागवू या, संविधान रुजवू या.असे विविध घोषवाक्ये तयार करुन संविधानाविषयी जनजागृती केली.
           याप्रसंगी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार आजही आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि खंबीर बनण्याची प्रेरणा देतात. विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार जीवनात अमलात आणावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले व आभार रेवणसिद्ध दसले यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages