Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती माढ्याचे जिल्हास्तरीय पुरस्काराचे उद्या वितरण

 महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती माढ्याचे जिल्हास्तरीय 

पुरस्काराचे उद्या वितरण 




 टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-पुणे विभागाचे माजी शिक्षक आ.दत्तात्रय सावंत प्रणित महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे माढा तालुक्यातील जिल्हास्तरीय शाळा शिक्षक पुरस्कार 2024 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सदर पुरस्कारांचे वितरण माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते उद्या रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजता सिंहगड कॉलेज कोर्टी, तालुका पंढरपूर येथे करण्यात येणार आहे. अशी माहिती नंदकुमार टोणपे यांनी दिली आहे.


 कृतिशील शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार पुढीलप्रमाणे संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी, आदर्श पब्लिक स्कूल कुर्डूवाडी अंकुलगाव, बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय बैरागवाडी, सुनंदा विद्यानिकेतन टेंभुर्णी, महात्मा फुले विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी कृतिशील शाळा पुरस्कार देण्यात येणार आहे. शिक्षण शास्त्र महाविद्यालय माढ्याचे प्रा हरिचंद्र आदिनाथ इंगळे यांना बी एड कॉलेज कृतिशील प्राचार्य पुरस्कार, के एन भिसे कॉलेज कुर्डूवाडीचे डॉ.सचिन वामन लोंढे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज माढ्याचे प्रेमचंद गुंडू गायकवाड यांना सीनियर कॉलेज कृतिशील प्राध्यापक पुरस्कार, जनता विद्यालय टेंभुर्णीच्या प्राध्यापिका उषा ज्ञानदेव पाटील, संत सावता माळी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आरणचे प्रा. बाबासाहेब तम्मा शेळके, बबनराव शिंदे कनिष्ठ कला महाविद्यालय परितेचे प्रा.विजय अशोक पाटील यांना ज्युनिअर कॉलेज कृतीशील प्राध्यापक पुरस्कार, छत्रपती शिवाजी विद्यालय भिमानगरचे दत्तू अभिमान डेपे, नवभारत विद्यालय दारफळचे शंकर बाबासाहेब ढावरे, नागनाथ विद्यालय कुर्डूचे संजय शिकंदर लावंड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला व महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज कुर्डूवाडीचे रोहिदास भिकाजी सोनवणे, प्रगती विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज कुर्डूचे रेश्मा शरद अनंतकळस यांना कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार, श्री शिवाजी आश्रम शाळा केवडचे नरेश्वर राजाराम पाटील यांना कृतिशील आश्रमशाळा मुख्याध्यापक पुरस्कार, आर्या पब्लिक स्कूल माढ्याचे सागर  जीवराज थोरात व डॉ. नेताजी करळे विद्यालय चिंचगावच्या प्रियंका विनोद शिंदे यांना  कृतिशील इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक पुरस्कार, बेंबळे येथील  विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे कुबेर दशरथ गायकवाड,  भाई भाई विद्यालय चांदजचे भिमराव तुकाराम जगदाळे, संगनबसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशाला मोडनिंब चे शेखर एकनाथ सुर्वे, संजीवनी विद्यालय मालेगावचे गजानन बाळासाहेब जोकार, कै मुकुंदराव हरहरे माध्यमिक आश्रमशाळा माढा उल्हास भास्कर सोनार, टेंभुर्णीतील ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मनीषा महेंद्र सोनवणे, पूज्य सुगंधा ताई पाटील विद्यालय भुताष्टे दत्तात्रय राजाराम देवकर यांना  यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार, हिंदवी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कुर्डूवाडीचे संतोष शिवाजी कापरे यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था कृतिशील शिक्षक पुरस्कार, नूतन विद्यालय कुर्डूवाडीचे प्रकाश रामलिंग दळवी, खिलोबा विद्यालय अंजनगावचे  विनोद सदाशिव काळे, संजयमामा शिंदे विद्यालय कुर्डूवाडीचे श्रीकांत अशोक सावंत यांना कृतिशील क्रीडा पुरस्कार, कुर्मदास विद्यालय लवूळचे तुकाराम नारायण भाकरे यांना कृतिशील ग्रंथपाल पुरस्कार, कर्मवीर लोहकरे गुरुजी माध्यमिक विद्यालय उजनी मा नवनाथ अभिमान पिसे यांना कृतिशील लिपिक पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे संजय श्रीरंग शिंदे यांना कृतिशील शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अशी एकूण 33 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 माढा तालुक्यातील  पुरस्कर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन माढा तालुका महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे दत्तात्रय ननवरे, नंदकुमार टोणपे, गणेश कोकाटे, बंडू जाधव, संपर्कप्रमुख महावीर आखाडे, समन्वयक गजानन लावर यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments