मी राजकारणात कामे करण्यासाठी आली आहे, टक्केवारी घेण्यासाठी नाही - खा. प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 23, 2024

मी राजकारणात कामे करण्यासाठी आली आहे, टक्केवारी घेण्यासाठी नाही - खा. प्रणिती शिंदे

 मी राजकारणात कामे करण्यासाठी आली आहे, टक्केवारी घेण्यासाठी नाही - खा. प्रणिती शिंदे




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मी काँग्रेसची खासदार आहे, त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवणे माझे काम आहे. मी राजकारणात कामे करण्यासाठी आली आहे, टक्केवारी घेण्यासाठी नाही. निवडून येण्यासाठी जनतेची कामे करावी लागतात, मला सत्कारासाठी फुलांच्या माळा ऐवजी कामाच्या निवेदनाच्या माळा द्या.
मी प्रत्येक मताची किंमत मोजेन त्यासाठी मी पुन्हा येईन, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
खा. शिंदे यांनी पापरी व खंडाळी या दोन गावांचा गाव भेट दौरा केला त्यावेळी त्या पापरी ता मोहोळ येथे बोलत होत्या.
यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या, मला संसदेत जाण्याची व कामे करण्याची संधी केवळ तुमच्यामुळे मिळाली, त्यामुळे माझ्याकडे पाठपुरावा करून कामे करून घ्या. तुमच्या हातात छडी आहे तिचा वापर करा.यावेळी गावकऱ्यांनी मारुती मंदिराच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली, ती खासदार शिंदे यांनी मान्य केली. 
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी शाळेसाठी वॉल कंपाऊंड, विद्यार्थ्यांसाठी सभागृह, संगणक, तसेच शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक व्हावी, यासह रस्ते काँक्रिटीकरण, स्मशानभूमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर कट्ट्या जवळ हाय मास्ट बसवावा आदींच्या मागण्याची निवेदने दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages