Hot Posts

6/recent/ticker-posts

अर्जित सिंगच्या गाण्याची तरुणाईला भुरळ

 अर्जित सिंगच्या गाण्याची तरुणाईला भुरळ





 सोलापूर मध्ये शो करण्याचा प्रयत्न करणार
    
 सुप्रसिद्ध गायक अर्जित सिंग हा सध्या सर्वत्र गाजत आहे. अनेक लोकांच्या मनात आपल्या सुमधूर आवाजाने घर केले आहे.  संगीतावर हा गायक जगप्रसिद्ध गाणी गात आहेत, चहात्याना भुजळ पाडत आहे. नुकत्याच झालेल्या हैदराबाद मधील शो मध्ये मंत्रमुग्ध करणारी गाणी गायली आणि आपल्या मधुर आवाजाने व छान अशा संगीताने सर्वांना खुश करून टाकले. अर्जित सिंग लाईव्ह इन कॉन्सर्ट पाहण्यासाठी मी उपस्थित होतो. सहजच असे डोक्यात आले की असे कार्यक्रम सोलापूरमध्ये झाले पाहिजे. जगप्रसिद्ध असणारे असे संगीतकार गायक सोलापूरला येऊन गातील आणि सोलापूर सारख्या प्रसिद्ध शहराला ही संधी मिळेल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सोलापुरातील मोठ्या संस्थांनी किंवा प्रसिद्ध उद्योजकांनी ही संधी उपलब्ध करून द्यावी, असे इथे आवर्जून सांगावे वाटते.  सोलापूर मध्ये असे कार्यक्रम झाले तर सर्वांसाठी ही एक पर्वणीच असेल. सोलापूरमध्ये विमान सेवा ही सुरू होत आहे, इथे पंचतारांकित हॉटेलही आहे, तसेच जागेचा अभाव नाही. सर्वाधिक जर प्रयत्न केला तर असे उच्चस्तरीय शो कॉन्सर्ट किंवा संगीत कार्यक्रम  होऊ शकतात यात काही दुजाभाव नाही. मोठ्या शहरांप्रमाणे सोलापूर मध्ये पण ही संधी चाहत्यांसाठी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असावे. एकंदरीतच या सोलापूर मध्ये संगीताचे आणि गाण्याचे रसिक मंडळी आहेत. अर्जित सिंग लाईव्ह इन कॉन्सर्ट ही एक आयुष्यातील सोलापूरकरांसाठी मोठी संधी असेल. शोमध्ये सुप्रसिद्ध गाणी गायली गेली, फटाक्यांची आतिषबाजी होती, उत्तम स्टेज, लाईट त्यातच जगप्रसिद्ध संगीतकार गात होते, नृत्य करत होते. खरंतर विस्मरणीय क्षण आज माझ्या डोळ्यावर समोरून जात नाहीये. त्यामुळे सोलापूरकरांनी ही हा अनुभव घ्यावा, असे मनापासून वाटत आहे.  रसिक मंडळींनी  पुढाकार घेऊन हे साध्य करावे असे इथे वाटत आहे. अशा कार्यक्रमामुळे  आर्थिक उलाढालला प्रोत्साहन मिळते. अशा कार्यक्रमाच्या मार्फत  लोकांना रोजगार पण मिळतो. विविध रुपी फायदे, काही खालील फायदे दर्शविले आहेत 
 ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज ना काम मिळते.
 बाहेर गावातील लोकांमुळे हॉटेल फुल होतात.
 बाहेर गावातील लोक खाण्यापिणे केल्यामुळे रेस्टॉरंटचा बिझनेस वाढतो.
 सिक्युरिटी एजन्सीला काम मिळते.
 रोजगार निर्मिती होते.
फ्लेक्स आणि डिजिटल मार्केटिंग ला वाव मिळतो.
टॅक्सी आणि वाहन चालकांना व्यवसाय मिळतो.
शासनाला ही चांगली संधी मिळते.
आयोजकांना  आपला उद्योग व व्यवसाय दर्शवण्याची संधी मिळते.
 प्रसार माध्यमांना कार्यक्रमाच्या मार्फत संधी उपलब्ध होते.
फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर तसेच ब्लॉगर व विविध सोशल मीडियावर सोलापूरचे नाव होते.
असे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हे कार्यक्रम सोलापूर मध्ये झाले पाहिजे असे चर्चेतून समोर आले आहे.
ऋत्विज चव्हाण
मोबाईल 8380800083
            9527377555
सोलापूर, महाराष्ट्र.

Reactions

Post a Comment

0 Comments