Hot Posts

6/recent/ticker-posts

दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्व दाखवण्याची क्षमता- कोहिनकर

 दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्व दाखवण्याची क्षमता-  कोहिनकर 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोणी धावले तर कोणी जागेवर उभा राहून लांब उडी घेतली. कोण पोहचले तर कोण दिव्यांगत्वावर मात करून स्पर्धेत जिंकण्याच्या आव्हानांना आव्हान देत स्वतः मधील क्रीडा नैपुण्य सिद्ध करीत होते.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत तब्बल ९३० दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते.
  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, प्रभारी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता शशिकांत ढेकळे, नॅबचे सचिव शशिभूषण यलगुलवार, दिव्यांग संस्था चालक चित्रसेन पाथरुट, राजकुमार पाटील, अरुण धोत्रे, रामचंद्र कुलकर्णी, समीर तडवळकर यावेळी उपस्थित होते.
  कोहिनकर पुढे म्हणाले,"दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण दडलेले असतात, त्यांना घडविणे हे आव्हानात्मक काम असून दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचारी यांनी व्रतस्थ भावनेने काम करण्याची गरज आहे."
    जिल्हा समाज कल्याण अधिकारी कवले म्हणाले,"दिव्यांग व्यक्तींचा सामाजिक अभिसरणात सहभाग वाढला पाहिजे,ते देखील समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत,या जाणिवेतून त्यांना सन्मान मिळणे गरजेचे आहे,हे ओळखून युनोने दिव्यांग दिनाची सुरुवात केली.दुर्दम्य इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर दिव्यांग विद्यार्थी दैदिप्यमान यश संपादन करु शकतात,हे या स्पर्धेतून स्पष्ट होते. सुरुवातीला राज्य स्तरावर क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविलेले लवंगी बालगृहातील खेळाडू बाली चामना,राजा समशेर, सचिन काळे, पृथ्वीराज शिंदे यांनी क्रीडा ज्योत आणली.उद्घाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांच्या हाती ज्योत सुपूर्द केली.मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन व करुन व खेळाडूंना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.दिव्यांग क्रीडा स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच कविता कोळगे यांनी खेळाडूंना शपथ दिली. सायंकाळी पर्यंत क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यशाळा अधिक्षक रामचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments