नातेपुते पोलीसांची कार्यवाही, विविध गुन्ह्यामधील १० लाख ७१ हजार रूपयेचा माल केला परत
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील चोरी घरफोडी सारख्या विविध उघडकीस आणलेल्या गुन्ह्यामधील १० लाख ७१ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली मुळ फिर्यादीस परत करण्यात आली.नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी भगवान बाबुराव पानसकर (रा.मोरोची, ता. माळशिरस) यांच्या राहते घर घरफोडी झाली होती. त्याचा तपास पोहेका महादेव कदम तसेच दि. ५ मे २०२४ रोजी प्रशांत नवनाथ राऊत (रा.फोंडशिरस, ता. माळशिरस) हे कामानिमित्त घरातून बाहेर गेले असताना घरफोडी झाली, त्याचा तपास पोना अमोल राजाराम वाघमोडे हे करीत होते. तसेच दि. ९ मे २०२४ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने बापु बबन पालवे (रा. मांडवे) यांचे बंद घर फोडून घरफोडी केली. त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने हे करीत होते. तसेच दि. ९ मे २०२४ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने बाबराव मारुती पालवे (रा.मांडवे) यांच्या उघड्या घरात प्रवेश करुन चोरी केली. त्याचा तपास पोहेकॉ राहुल सुग्रीव रणनवरे हे करीत होते. दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पौर्णिमा राजेद्र सोनवळ यांच्या घरातून बचत गटाचे मंजूर कर्जाची रोख रक्कम ४ लाख ९३ हजार रुपये ठेवलेली सॅक चोरीस गेली होती, त्याचा तपास पोना राकेश लोहार करीत होते.सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहिती मिळवून सदर गुन्हा करणारे वेगवेगळ्या आरोपीना नातेपुते पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अटक करुन त्यांच्याकडून वरील गुन्ह्यातील १० लाख ७१ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केले होते. सदरचे गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल वरील फिर्यादीस देण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यु.बी. पेठे यांनी आदेश केला होता. त्यावेळी वरील गुन्ह्यातील फिर्यादीने नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने, पोहेकॉ नितीन तळेकर, पोहेकों राहुल रणनवरे, पोहेका महादेव कदम, पोना अमोल वाघमोडे, पोना राकेश लोहार यांचे आभार मानले.
0 Comments