खत ,पाणी व फवारणी अचूक केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन - सचिन नलावडे
निमगाव (कटूसत्य वृत्त):- ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरच्या सुरुवातीसच पश्चिम महाराष्ट्रातील काही आंबा बागांना मोहोर येण्यास सुरुवात झाली होती परंतु डिसेंबरच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच आंबा बागांना मोहर आले असून मोहर आलेल्या आंबा बागेचे पाणी खत व फवारणीचे सुयोग्य नियोजन केल्यास आंबा उत्पादकांना येत्या हंगामात भरघोस उत्पादन मिळू शकते यासाठी सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे असे मत महादेश फार्मस चे संस्थापक अध्यक्ष सचिन नलावडे यांनी व्यक्त केले
निमगाव म ता माळशिरस येथे महादेश फार्म्स व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंबा कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी कार्यालय माळशिरसचे प्र मंडळ कृषी अधिकारी सुरेश देवकाते ,आत्मा चे व्यवस्थापक कुलदीप ढेकळे ,कृषी भूषण अंबा उत्पादक शेतकरी डॉ. केशव सरगर , हनुमंत पवार, शिवामृतचे संचालक हरिश्चंद्र मगर, कृषी सहायिका अंकिता चव्हाण ,बंडगर, क्षीरसागर आंबा निर्यातदार राहुल खेनट आदी मान्यवर उपस्थित होते .
निमगाव येथील अंबा उत्पादक शेतकरी निनाद पाटील यांच्या केशर आंबा बागेत झालेल्या कार्यशाळेत बोलताना नलावडे म्हणाले की,
मोहोर कालावधीमध्ये फळधारणा होत असताना पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे याचबरोबर मोहराचे फुलात रूपांतर होत असताना त्यावर उग्र स्वरूपाचे कीटकनाशके टाळावीत जेणेकरून परागीकरण होत असताना मधमाशांना अडचण येणार नाही मोहर कालावधीत पाऊस झाल्यास आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही ज्या दिवशी पाऊस येणार आहे त्या दिवशी आलेले फुले फक्त कोमजून जातात परंतु इतर फळांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही परंतु तात्काळ त्यावर बुरशीनाशक व निमार्कची फवारणी घेणे गरजेचे आहे यावेळी आंबा लागवडीपासून त्याची छाटणी, विरळणी, संगोपन ,खत पाणी ,फवारणी व्यवस्थापन याचबरोबर आंब्याचा बहार लवकर येण्यासाठी देण्यात येणारे कल्टर कसे वापरावयाचे याबाबतही महादेशचे सचिन नलावडे यांनी मार्गदर्शन केले.
माळशिरचे प्र मंडळ कृषी अधिकारी सुरेश देवकाते यांनी शासनाने नव्याने सुरू केलेल्या ॲग्रीस्टॅक या योजनेची माहिती देऊन शासनाच्या वतीने फळबाग लागवडीसाठी ज्या विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्या सर्व योजनांची माहिती दिली कृषी भूषण अंबाउत्पादक शेतकरी डॉ. केशव सरगर यांनीही यावेळी आंबा उत्पादकांना मार्गदर्शन केले निमगाव येथे आयोजित केलेल्या आंबा कार्यशाळेत तालुक्यातील शंभर अंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार आंबा उत्पादक शेतकरी निनाद पाटील यांनी मानले.
0 Comments