जिल्ह्याला मंत्रिपद नाहीच! सोलापूरच्या आमदारांमधे कर्तृत्व नाही का?
- - पालकमंत्री सुद्धा बाहेरचा
- - जिल्ह्याचा विकास होणार ठप्प?
- सोलापूरकरांचा राज्य सरकारवर संताप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथवीधी थाटामाटात नागपूर येथे पार पडला. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला आकस बुध्दीने पुन्हा डावलण्यात आल्याचं बोललं जातंय. सोलापूरच्या आमदारांमधे कर्तृत्व नाही का?
हे पुन्हा-पुन्हा सिध्द करण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातोय. सोलापूरला कोणतेही मंत्रीपद नाही. या उलट जिल्ह्याचा पालकमंत्री सुध्दा स्थानिक नाही. परिणामी आगामी पाच वर्षांत जिल्ह्याचा विकासावर प्रश्न चिन्ह कायम दत्त म्हणू उभं राहिलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्थानिक आमदार मंत्री नसल्यामुळे, मागूनही निधी मिळत नाही. त्यामुळे विकास ठप्प झाल्याची भावना सोलापूरकरांमध्ये आहे. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारातही सोलापूर जिल्ह्यातून कोणालाही कॅबिनेट किंवा राज्य मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे सोलापूरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपचे विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे व अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी व पंढरपूरचे समाधान आवताडे अशा एकूण पाच आमदारांना दणदणीत मताधिक्यांनी विजयी केले आहे. यातील विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांना मंत्री पदाच्या कामाचा चांगला अनुभव आहे. अक्कलकोटचे आमदार कल्याणशेट्टी यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून शहर व जिल्ह्यात उत्तम काम पाहिले आहे. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. तरीही चारही आमदारांना पैकी मंत्रीपद नाही. याचा अर्थ भाजपच्या उमेदवाराला निवडून देवून सोलापूरकर चूक तर करत नाही ना? असा सवाल सोलापूर विकास मंचच्या वतीने राज्य सरकारला विचारला जात आहे.
स्वातंत्र्याच्या संग्रमात देशात प्रथम सोलापूर स्वातंत्र्य झाले नंतर देश स्वातंत्र्य झाला. आशा या क्रांतीकारी इतिहास असलेल्या सोलापूरला मात्र मंत्रीपदासाठी सातत्त्याने वगळले जात आहे. सोलापूरला ऐतिहासिक, औद्योगिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असूनही जिल्ह्याला आवश्यक असे राजकीय प्रतिनिधित्व मिळत नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. लोकांना आशा होती की यंदा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यातून असतील, मात्र पुन्हा एकदा जिल्ह्याला उपेक्षित ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
"पालकमंत्री बाहेरचा असल्यामुळे सोलापूरच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अपूर्ण प्रकल्प, उद्योग विकासाची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे," असे मत जिल्ह्यातील विकास कार्यात पुढाकार घेणाऱ्या अनेक संघटनांनी सोलापूर विकास मंचकडे व्यक्त केले आहे.
सरकारला याची किंमत मोजावी लागेल!
सोलापूरकरांनी आता या परिस्थितीवर तीव्र नाराजी दर्शवत सध्याच्या सरकारवर टीका केली असून. जिल्ह्याच्या विकासासाठी स्थानिक नेतृत्वाची मागणी केली आहे. "जिल्ह्याला त्याचा हक्काचा आवाज उचलणारा प्रतिनिधी मिळाला नाही. तर पुढील निवडणुकीत याचा फटका सरकारला बसेल. परिणामी किंमत मोजावी लागेल." असा इशाराही सोलापूरकर देत आहेत. सोलापूरच्या विकासासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता शहर व जिल्हाभर जोर धरत असल्याची माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, ॲड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर यांनी दिली.
0 Comments