सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 16, 2024

सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई

 सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील 3 सरपंचासह तब्बल 14 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केले आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करणे, निवडणूक खर्च वेळेत सादर न करणे यासह अन्य काही कारणांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही कारवाई केली आहे.
2021 ते 2022 दरम्यान या ग्रामपंचायत बाबतीत तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावर सुनावण्या झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अंतिम निकाल जाहीर केला आहे.
दक्षिण सोलापुरातून हे सदस्य अपात्र
वेळेत निवडणूक खर्चाचा तपशील सादर न केल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेजश्री संजय गायकवाड यांचे सरपंच पद रद्द झाले आहे. यासोबत मनगोळी ग्रामपंचायतचे सदस्य अंजली चव्हाण, नूरजहाँ शेख, शांताबाई कांबळे, बलभीम खांडेकर यांचे पद देखील रद्द झाले आहे. 
माढा तालुक्यातील 7 ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई माढा तालुक्यातील रांझणी ग्रामपंचायतच्या एकूण 7 सदस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्त्रतेची कारवाई केली. सोनाली माने, रोहिदास गायकवाड, नेताजी चमरे, संगीता पाटोळे, चंचला पाटील, प्रीतम पाटील, दीपाली गायकवाड आदींचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या सदस्यांवर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड यांचेही पद रद्द झाले आहे.
पदाचा गैरवापर करणं पडलं महागात पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील हिवरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य अनिता पवार यांचे पद रद्द झाले आहे. तर बार्शी तालुक्यातील खडकोणी ग्रामपंचायतचे सदस्य मनीषा कोथमिरे तसेच गीता आगाव यांचेही सदस्यत्व रद्द झाले आहे.  तीन अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने सदस्यत्व रद्द दरम्यान तीन अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने सांगोला तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतचे सदस्य अर्जुन साळुंखे, अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दिलीप माळी, माळशिरस तालुक्यातील बचेरी ग्रामपंचायतचे सदस्य शालन माने यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages