Hot Posts

6/recent/ticker-posts

सोपलांच्या विजयानंतर वैराग परिसरात जल्लोष

 सोपलांच्या विजयानंतर वैराग परिसरात जल्लोष



वैराग (कटूसत्य वृत्त):- विधानसभेच्या परंपरागत बार्शी विरोधक माजीमंत्री दिलीप फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालांची केली उधळण सोपल व आ. राजेंद्र राऊत यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीतील शेवटपर्यंतच्या चुरशीच्या मतमोजणीत माजीमंत्री सोपल यांचा सुमारे सहा हजार मतांनी विजय झाल्याने वैराग शहर व परिसरातील गावांत फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण करून कार्यकत्यांनी विजयोत्सव साजरा केला. बार्शी विधानसभेत वैराग भागातील मतदान निर्णायक ठरणार हे अगोदरच प्रतिस्पध्यांनी जाणले होते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे वैराग भागावर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये आमदार राजेंद्र राऊत आघाडीवर होते. लक्ष परंतु, बार्शी शहर मतमोजणी संपल्यानंतर वैराग भागातील चार जिल्हा परिषद गटाची मतमोजणी सुरू झाल्यावर मात्र थोड्याफार फरकाने माजीमंत्री दिलीप सोपल यांना मताधिक्य मिळत गेले. त्याचबरोबर पोस्टल मतदानामध्येही सोपल यांनाच मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले. वैराग शहरातून २ हजार ६६ मताधिक्यही सोपल यांनाच प्राप्त झाले. याचबरोबर वैराग भागात माजीमंत्री सोपल हे सहा असलेल्या गावांतील मतदारांची साथही त्यांनाच लाभल्याने या निवडणुकीत त्यांना विजय मिळविता आला. मतमोजणीच्या सुरुवातीपासून आ. राऊत यांनी शेवटच्या फेरीपर्यंत दिलेली लढत व मतातील असणारा फरक क्षणोक्षणी दोघांचीही धाकधूक वाढवणारा ठरत होता. अखेर २४ व्या फेरीनंतर हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्याचे समजताच वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, माजी सभापती मकरंद निंबाळकर यांच्या सर्व कार्यकत्यांनी व सोपलप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, गावातील प्रमुख रस्त्यांवर फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
Reactions

Post a Comment

0 Comments