देशविरोधी शक्तींना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस, उद्धव ठाकरेंना धडा शिकवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 14, 2024

देशविरोधी शक्तींना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस, उद्धव ठाकरेंना धडा शिकवा

 देशविरोधी शक्तींना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसउद्धव ठाकरेंना धडा शिकवा



भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आवाहन  



मुंबई (कटूसत्य वृत्त):- राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष देशविरोधीविभाजनवादी शहरी नक्षलवाद्यांच्या आश्रयाला जाऊन बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंची प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी गुंडाळून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. अशा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मतदारांनी धडा शिकवावाअसे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी बुधवारी केले. श्री. नड्डा यांनी अभियंतेसनदी लेखापालडॉक्टर आदी विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधताना हे आवाहन केले. मलबार हिल मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे यावेळी उपस्थित होते.   

यावेळी श्री. नड्डा यांनी देशातील विभाजनवादी शक्तींना शहरी नक्षलवादी टोळीकडून कशा प्रकारे सहाय्य मिळत आहे याचे विस्ताराने विवेचन केले. श्री. नड्डा म्हणाले कीकर्नाटकातील काँग्रेसचा खासदार, दक्षिणेकडून केंद्राला अधिक कर जातो मात्र त्याचा विनियोग उत्तर भारतासाठी होत असल्यानेदक्षिण भारतासाठी स्वतंत्र देश हवा अशी भाषा करतो तेव्हा त्याचा निषेध ही होत नाही. जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्याला काँग्रेसची उमेदवारी मिळतेयावरून काँग्रेसचा देशविरोधी शक्तींना असलेला पाठिंबा दिसून येतो.  

महाराष्ट्र ही क्रांतिकारकांचीसमाजसुधारकांची भूमी आहेअसा उल्लेख करत श्री. नड्डा यांनी आपल्या संवादास प्रारंभ केला. श्री. नड्डा म्हणाले कीमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोदी सरकारचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे.  मराठी सारख्या वैभवशाली परंपरा असलेल्या भाषेतील संतांनीसाहित्यिकांनी भारताच्या सांस्कृतिकअध्यात्मिक परंपरेची सामान्य माणसाला ओळख करून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.    

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजकीय संस्कृती पूर्णपणे बदलून टाकल्याचे सांगतगेल्या 10 वर्षांत देशाच्या राजकारणाची परिभाषा कशी बदलली याचा विस्ताराने श्री. नड्डा यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी देशात घराणेशाहीभ्रष्टाचार याला प्रतिष्ठा मिळाली होती. राजकीय स्वार्थासाठी धर्मराज्यभाषा यांच्या आधारे जनतेला एकमेकांविरुद्ध झुंजवत ठेवले जात असे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर राजकारणाला विकासाची,उत्तरदायित्वाचीगरिबांच्या सेवेची भाषा केली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने आपल्या कामगिरीचे प्रगती पुस्तक वारंवार जनतेपुढे ठेवलेच पाहिजेहे श्री. मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत आपल्या कृतीने दाखवून दिले. आपल्या प्रगती पुस्तकाबरोबरच पंतप्रधानांनी भविष्यकाळात देशाची वाटचाल कशी असेल हे स्पष्ट करणारी धोरणेही जनतेपुढे नियमितरूपाने मांडली. यामुळे देशाची राजकीय संस्कृती आमूलाग्र बदलली. ‘सबका साथसबका विकाससबका विश्वाससबका प्रयास’ नावाची नवी राजकीय संस्कृती जन्माला आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages