मोहोळ येथे रविवारी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
अंकोली, ( कटूसत्य वृत्त ):- मोहोळ तालुक्यातील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा रविवार दि.१७ रोजी दुपारी बारा वाजता मोहोळ येथील शुभम लॉज याठिकाणी आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मोहोळ तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेचे अध्यक्ष कड्याप्पा गोविंद पवार यांनी केले आहे. या मेळाव्यास पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. सुभाष वायदंडे हे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मोहोळ येथील शुभम लॉज कॉन्फरन्स हॉल येथे रविवार दि.१७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणाऱ्या या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख कृष्णाजी गायकवाड, सोलापूरdd वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश वाघमारे, सोलापूर जिल्हा महिला कार्याध्यक्षा वनिता पवार, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड,उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष संदीप देवकुळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष भैय्या मस्के, मोहोळ युवक तालुकाध्यक्ष अभिजीत नेटके आणि इतर सर्व पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी आपण ही हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या मेळाव्यात काही नवीन इच्छुक पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष सुभाष वायदंडे सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.
0 Comments