Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदारांचा विश्वास कायम जपत राहीन!

मतदारांचा विश्वास कायम जपत राहीन!

·   चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

·   कामठीच्या विकासासाठी एक मताचे कर्ज मागतोय!








  नागपूर( कटूसत्य वृत्त ):-  हिंदू असोमुस्लिम असोमागासवर्गीय असोप्रत्येकाचे हित तुम्ही दिलेल्या उमेदीत आहे. जात-पात आणि धर्मभेद विसरून एकत्र येऊन कामठीच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी मदत करावी. 15 वर्षे कामठीच्या विकासासाठी काम केले. पुढील पाच वर्षेही तुम्ही दिलेला विश्वास जपत राहीलअसे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच भाजपा-महायुतीचे कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. येत्या निवडणुकीत जनतेच्या एक मताचे कर्ज मागूनविकासाच्या वचनाचा नवा संकल्प घेतला.

मंगळवार दि. 12 रोजी त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातील विहिरगावउंबरगावकळमनारामगडकामठी शहरातील विविध भागात भेटी दिल्या व दीपावली मिलन सोहळ्यात सहभागी झाले. मतदारांमध्ये नवा विश्वास भरतानाते म्हणाले कीकेंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या 58 योजनेच्या भरवश्यावर या भागाचा विकासाचा आराखडा तयार करून विकासकामे पुढे घेऊन जाणार आहे. निवडणुकीत विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचाराचा उल्लेख करताना बावनकुळे यांनी मतदारांना खोट्या नॅरेटिव्ह पासून जागरुक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले या भागातला प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. कामठी शहरात सुलेखाताई कुंभारे यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे या भागाच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासोबत मनीष वाजपेयीविवेक मंगतानीलाला खंडेलवालअजय अग्रवालपंकज वर्मासंध्या रायबोलेचंद्रशेखर तुप्पटउज्वल रायबोलेलालसिंग यादवविजय कोंडुलवारकपिल गायधनेराज हाडोतीकुणाल सोलंकीदीपक नेटीपप्पूजी राऊतसूरज शिंदेनरेश पारवानीरामजी शर्मासंदीप कनोजियायोगेश गायधनेकैलाश मलिकसुभाष भात्रा उपस्थित होते

 

मुख्यमंत्री योगींसोबत सभा

श्री. बावनकुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अमरावती जिल्ह्यातील अचलपूरअकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिमनागपूर जिल्ह्यातील नागपूर मध्य आणि नागपूर दक्षिण विधानसभा क्षेत्रात प्रचारसभांमध्ये सामील झाले. या सभामधून त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करताना भाजपा- महायुती सरकार महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा विश्वास मतदारांना दिला. विरोधकांकडे विकासाचे काहीच मुद्दे नसल्याचे आरक्षण आणि इतर मुद्दयांवर निवडणूक लढवित आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments