Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपकडून देशात विकासवाद महायुतीला विजयी करण्याचे नड्डा यांचे आवाहन

भाजपकडून देशात विकासवाद महायुतीला विजयी करण्याचे नड्डा यांचे आवाहन






अक्कलकोट, (कटुसत्य वृत्त):-
भाजपने मागील दहा वर्षांत देशात परिवारवाद आणि भ्रष्टाचार नष्ट करून विकासवाद सुरू केला. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार निवडून द्या आणि अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी यांना वळ द्या, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

सोमवारी, बॅगेहळ्ळी रोडवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार
सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत नड्डा वोलत होते.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे सुरू आहेत. अट सेतू केंद्र सरकारची आरोग्य योजना, अनेक राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते, अनेक मोठ्या पुलांची
कामे मंजूर केली आहेत आणि ती सुरू देखील झाली आहेत. ही कामे आपण बळ दिल्यामुळे आणि ताकद दिल्यामुळे होऊ शकली. राज्यातसुद्धा महायुतीच्या सरकारमुळे विकासाला गती प्राप्त झाली आहे. भाजपने जनतेला विकासाची हमी दिली आहे. तुम्ही अक्कलकोटमधून
सचिन कल्याणशेट्टी यांना निवडून द्या, विकासाची हमी आम्ही तुम्हाला देतो, अशा प्रकारचे अभिवचन नड्डा यांनी दिले. देशात काँग्रेसने परिवारवाद वाढविला आणि भ्रष्टाचार करून देश खिळखिळा केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे आपल्या स्वतःच्या वडिलांचा विचार धुडकावून काँग्रेसच्या विचारधारेसोवत जाऊन वसले.= हा स्वतःच्या वडिलांचा देखील अपमान आहे, हे जनता कदापि विसरू शकणार नाही, असे सांगून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

यावेळी व्यासपीठावर कर्नाटकचे आमदार वसवराज मत्तीमोड, चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, दिलीप सिद्धे, संजय
देशमुख, अविनाश मडिखांवे, मिलन कल्याणशेट्टी, आनंद तानवडे, अप्पू विराजदार, परमेश्वर यादवाड, नन्नू कोरवू, सुरेखा होळीकट्टी, शिवराज स्वामी, मल्लिनाथ स्वामी, प्रभाकर मजगे, अण्णाप्पा वाराचारे, रामचंद्र होनराव, शिरीप पाटील, आप्पासाहेव पाटील आदींची उपस्थिती होती..
Reactions

Post a Comment

0 Comments