Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री गणपती इन्स्टिट्यूट मध्ये एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

 श्री गणपती इन्स्टिट्यूट मध्ये एकदिवसीय कार्यशाळा संपन्न



 टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- 
श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च  टेंभुर्णी येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी सांगलीचे रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मनीष कोंडावर यांचे "अनालायटिकल टेक्निक्स इन फार्मसी: अ वन डे रिसर्च इमर्शन" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. डॉ. कोंडावार यांनी अनालायटिकल इन्स्ट्रुमेंट आय-आर स्पेक्ट्रोस्कॉपी, यू-व्ही स्पेक्ट्रोस्कॉपी व एचपीएलसी याबद्दल विस्तृत माहिती दिली व याबद्दल प्रात्यक्षिकही घेतले. अनालायटिकल स्किलचा विद्यार्थ्यांना रिसर्च तसेच फार्मा इंडस्ट्री मध्ये खूप महत्त्वाची भूमिका असून ग्रॅज्युएशन लेव्हल ला याचे ज्ञान अवगत झाल्यास पुढे एम फार्मसी रिसर्च मध्ये चांगले काम करू शकतील. 

यानंतर डॉ. कोंडावर यांनी नॅक मूल्यांकन प्रणालिबद्दल थोडक्यात माहिती दिली व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, बारकावे विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नामदेव शिंदे यांनी केले तर प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. आर.डी.  बेंदगुडे यांनी थोडक्यात अनालिटिकल स्किल्स चे महत्व थोडक्यात सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष श्री. बाबा येडगे यांनी असे कार्यक्रम सतत आयोजित करण्याबद्दल व विद्यार्थी सर्वांगीण विकास होण्यासाठी लागेल त्या गोष्टी करण्याचे आवाहन केले. 

Reactions

Post a Comment

0 Comments