प्रेस नोट
महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार-हेमंत पाटील
विधानसभा निवडणूक निर्णायक वळणावर
मुंबई(कटूसत्य वृत्त):-'स्विंग मतदार', मराठा आरक्षण,बंडखोरी आणि सहानुभूतिच्या लाटेमुळे महाराष्ट्राला यंदा नवीन चेहरा मुख्यमंत्री म्हणून लाभेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केला.विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपले आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार मोहिमांना वेग दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री,विविध केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात भाजपचा प्रचार करीत आहेत. महाविकास आघाडीची धुरा राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने विधानसभा निवडणूक निर्णायक वळणार आली आहे. अशात महाराष्ट्राला यंदा नवीन चेहरा मुख्यमंत्री पदी लाभेल, असे भाकित पाटील यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदें ऐवजी नवीन चेहरा यंदा मुख्यमंत्री पदावर दिसून येईल.'स्विंग मतदार' यावेळी महत्वाची भूमिका बजावणार आहे. मराठा,धनगर आरक्षणाच्या आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. काही पॉकिट्स मध्ये याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भातील ६२ जागा निर्णायक ठरणार आहेत. कॉंग्रेसने या भागात त्यामुळे जोर लावला आहे. कोकण, मराठवाडा आणि मुंबईत सहानभुतिच्या लाटेवर स्वार होवून जास्तीत जास्त जागा जिंकून 'स्ट्राईक रेट' चांगला ठेवण्याच्या प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह महत्वाच्या मतदारसंघांमध्ये शरद पवारांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडवणीस यांचाच चेहरा असेल , असा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. पंरतु, ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार या सूत्रानूसार सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.दोन्ही बाजूने चढाओढ होत असल्याने अटीतटीच्या सामन्यात विजयाचे अंतर हे कमी होणार आहे.अपक्ष आणि तिसरी आघाडीचा फटका देखील युती आणि आघाडीला बसू शकतो, असे मत
0 Comments